किळसवाणा प्रकार, ऑनलाइन आईस्क्रिम अन् कोनमध्ये माणसाचं तुटलेलं बोट; महिलेला बसला धक्का!

मुंबईतील मालाडमधील एका महिलेने गोड खाण्याची इच्छा झाली म्हणून ऑनलाइन आईस्क्रिमची ऑर्डर केली होती. आईस्क्रिम खाताना महिलेला धक्काच बसला.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

मुंबईतील मालाडमधील एका महिलेने गोड खाण्याची इच्छा झाली म्हणून ऑनलाइन आईस्क्रिमची ऑर्डर केली होती. या आईस्क्रिमच्या कोनमध्ये एका माणसाचं तुटलेलं बोट आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर महिलेने जवळील मालाड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. 

यानंतर पोलिसांनी यम्मो आईस्क्रिम कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि आईस्क्रिम तपासणीसाठी पाठविण्यात आलं आहे. याशिवाय पोलिसांनी आईस्क्रिममध्ये सापडलेलं तुटलेलं बोट एफएसएलला (फॉरेन्सिक) पाठवलं आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे. 

काय आहे महिलेचा दावा?
महिलेने दावा केला आहे की, तिने यम्मो आईस्क्रिममधून ऑनलाइन आईस्क्रिम ऑर्डर केली होती. इतकच नाही तर महिलेने अर्ध्याहून अधिक आईस्क्रिम खाल्लं होतं. त्यावेळी महिलेला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. तिने नीट पाहिलं तर आईस्क्रिममध्ये माणसाचं तुटलेलं बोट होतं. यानंतर महिला हैराण झाली आणि तिने तातडीने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Advertisement

प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, या महिलेने एक ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून आईस्क्रिम ऑर्डर केलं होतं. महिलेने सांगितल्यानुसार, या आईस्क्रिममध्ये दोन सेंटीमीटर लाबींचं माणसाचं तुटलेलं बोट आढळलं आहे.