तीन बायका आणि फजिती ऐका ही म्हण सर्वांनाच माहित आहे. अशी स्थिती प्रत्यक्षात आली तर काय होईल? विचार करुनही चक्कर येईल. अशा घटना फक्त चित्रपटामध्येच पाहायला मिळतात. पण अशी घटना प्रत्यक्षात घडल्याचे समोर आले आहे. पहिली बरोबर लग्न, दुसरी बरोबर वॉटरपार्कमध्ये फुल टू मज्जा आणि तिसरी बरोबर संसार थाटण्याची तयारी. अशा स्थिती असलेल्या नवऱ्याला रंगेहात पकडल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या बस्ती इथे घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र नवऱ्यानेही पत्नीवर गंभीर आरोप करत या संपुर्ण प्रकरणालाच वेगळे वळण दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना उत्तर प्रदेशातल्या बस्ती जवळील तिघरा या गावात घडली आहे. या गावात धर्मेंद्र नावाच युवक राहतो. त्याचे लग्न झाले आहे. पण त्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धर्मेंद्र याचे कानपूरमध्ये प्रिया नावाच्या मुली बरोबर लग्न केले आहे. तर बस्तीमध्ये रिमझिम नावाच्या मुली बरोबर ही धर्मेंद्रने लग्न केल्याचा, पहिल्या पत्नीचा आरोप आहे. तो वॉटरपार्कमध्ये त्या मुली बरोबर मज्जा करत होता. त्यावेळी आपण त्याला रंगेहाथ पकडल्याचा दावा पहिल्या पत्नीचा आहे. मात्र पकडल्यानंतर तो तिथून पळून गेला असा आरोपही तीने लावला आहे. धर्मेंद्र विरोधात तिने तक्राही दाखल केली आहे.
पत्नीच्या आरोपानंतर पती धर्मेंद्रनेही पत्नीला लक्ष्य केलं. पत्नीचे अनैतिक संबध आहेत असा आरोप त्याने पोलिसां समोर केला आहे. गिरजा वर्मा या पोलिस शिपाया बरोबर आपल्या पत्नीचे संबध आहेत. तो तिला गाडीवर घेवून फिरत असतो. आपण त्याला रंगेहाथ पकडले होते. पण त्याने आपल्याला मारहाण केली. शिवाय पैसेही चोरून नेले असा आरोप धर्मेंद्र याने केला आहे. याबाबतची तक्राही पोलिसांनी दाखल करून घेतली आहे. या संपुर्ण प्रकरणाने पोलिसही चक्रावून गेले आहेत. याबाबत अधिक तपास आता पोलिसांनी केला आहे. त्यामुळे सत्य काय आहे हे समोर त्यांना आणावे लागणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - Mumbai News: एकाच नंबरच्या दोन गाड्या ताज हॉटेलमध्ये आल्या, अन् पुढे जे घडलं ते...
एकीकडे पहिली पत्नी आपल्या पतीने एक नाही तर तीन लग्न केली आहेत असा आरोप करत आहे. आपल्याला सोडून दोघीं बरोबर तो मज्जा करत आहे असा ही तिचा आरोप आहे. असं असताना पती ही मागे राहीला नाही. त्याने थेट पत्नीच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केली आहे. शिवाय तिचे संबध कोणा बरोबर आहे हे नाव घेवून सांगितले आहे. ज्या व्यक्तीचे नाव घेतले आहे तो पोलिसातच कामाला आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे.