भयंकर! पत्नीचे तुकडे-तुकडे करुन प्रेशर कुकरमध्ये टाकले, माजी सैनिकानं गाठला क्रूरतेचा कळस

Hyderabad man chops wife : मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून उकळले. त्यानंतर आरोपीनं ते उकळलेले तुकडे मीरपेट तलावात फेकून दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Hyderabad man chops wife : हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्याच्या घटनेत गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर या प्रकारच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. याच पद्धतीची मानवता आणि नातेसंबंधांना काळिमा फासणारी एक घटना हैदराबादमध्ये उघड झाली आहे. येथील एका माजी सैनिकाला त्याच्या पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली (Hyderabad Wife Murder) अटक करण्यात आली आहे. 

आरोपी पतीवर त्याच्या पत्नीच्या शरीराचे लहान तुकडे (Dead Body Chopped) केल्याचा आरोप आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून उकळले. त्यानंतर आरोपीनं ते उकळलेले तुकडे मीरपेट तलावात फेकून दिले. मृत शरीराची विल्हेवाट लावणं सोपं जावं तसंच आपल्यावर कुणी संशय घेऊ नये म्हणून त्यानं ही कृती केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गूरु मूर्ती (वय 45) असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो माजा सैनिक असून डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (DRDO) तो सध्या सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. त्यानं पोलिसांसमोर त्याचा गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे. 

वेंकट माधवी (वय 35) असं मृत महिलेचं नाव आहे. त्या 16 जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर त्यांना गुरुवर संशय आला. त्यांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली आहे.  

Advertisement

( नक्की वाचा : Black Warrant : 40 वर्षांनी पुन्हा ताजं झालेलं रंगा-बिल्ला प्रकरण काय आहे? त्यानंतर दिल्ली कशी बदलली? )

पोलीस निरीक्षक नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मृत महिलेच्या पालकांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी तिचा नवरा देखील त्यांच्यासोबत आला होता. आम्हाला त्याच्याबद्दल संशय वाटला. त्यानंतर त्याची चौकशी केली. या चौकशीमध्ये त्यानं हत्या केल्याचं मान्य केलं.

Advertisement

कशी केली हत्या?

गुरुमूर्तीनं केलेल्या दाव्यानुसार, त्यानं त्याच्या पत्नीच्या मृतदेहाचे बाथरुममध्ये तुकडे केले आणि नंतर ते तुकडे कुकरमध्ये उकळले. त्यानं मुसळीच्या मदतीनं सर्व हाडं वेगळी केली आणि त्यानंतर ती पुन्हा उकळली. तीन दिवस मांस आणि हाडं अनेकदा शिजवल्यानंतर त्यानं हे अवयव पॅक केले आणि तलावात फेकले,' गुरुमूर्तीच्या या दाव्याची पडताळणी अद्याप बाकी आहे.
 

Topics mentioned in this article