IPS Riti Raj: हैदराबादमधील एका प्रसिद्ध पबमध्ये प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एका महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने केलेल्या अंडरकव्हर ऑपरेशनमुळे पबमध्ये चालणारी अनैतिक कृत्य उघडकीस आली आहेत. साध्या वेशात पोहोचलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याने आधी पबमध्ये सुरू असलेल्या घडामोडींची पाहणी केली आणि त्यानंतर धडक कारवाई केली. या ऑपरेशन दरम्यान चार महिला आणि पाच पुरुषांसह नऊ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी केपीएचबी (KPHB) पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादच्या कुकटपल्ली भागात असलेल्या एका प्रसिद्ध पबमध्ये सेक्स रॅकेटसह इतर अनैतिक प्रकार सुरू होते.
महिला IPS अधिकाऱ्याने असे राबवले अंडरकव्हर ऑपरेशन
रविवारच्या (7 जून) रात्री वर्ष 2018 च्या बॅचच्या तेलंगणा कॅडरच्या अधिकारी आणि कुकटपल्लीच्या डीसीपी (DCP) रिती राज (IPS Riti Raj) यांनी येथे अंडरकव्हर ऑपरेशन राबवले. ज्यामध्ये अनेक नियमांच्या उल्लंघनाचा पर्दाफाश झाला. केपीएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या 'किंग्स अँड क्वीन्स पब' (क्लब मस्ती) वर छापा टाकण्यापूर्वी डीसीपी रिती राज (IPS Riti Raj) यांनी गुप्तपणे तपास केला होता.
वेश्या व्यवसायाला खतपाणी घालत होता पब?
पबच्या आत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. पोलिसांच्या मते, हा पब कथितरीत्या ग्राहकांना आकर्षित करण्याचे आणि वेश्या व्यवसायाला खतपाणी घालण्याचे काम करत होता. तपासादरम्यान असेही आढळून आले की, दारू विक्री केल्या जाणाऱ्या या ठिकाणी अल्पवयीन मुलांचा प्रवेश रोखण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात अपयशी ठरले होते.
पबकडे NOC सुद्धा नाही; पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिलांचा वापरहा पब कथितपणे ठरवून दिलेल्या वेळेनंतरही सुरू होता. येथे नियमांचे उल्लंघन करून दारू आणि खाद्यपदार्थ पुरवले जात होते. पबकडे वैध 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (NOC - नाहरकत प्रमाणपत्र) देखील नव्हते. पोलिसांनी सांगितले की, "प्राथमिक पुराव्यांनुसार येथे पुरुष ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि चुकीच्या पद्धतीने नफा कमवण्यासाठी जास्तीचे बिल तयार करण्याच्या उद्देशाने महिलांचा वापर केला जात होता."
(नक्की वाचा : Dadar News: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दादरमध्ये बसने गाड्यांना कसं उडवलं? पाहा CCTVसह दुर्घटनेचे 11 PHOTOS)
पबवर यापूर्वीही झाली होती कारवाई
संबंधित पब अनैतिक कृत्यांना प्रोत्साहन देत होते आणि कथितपण ग्राहकांसाठी महिलांची सोय करत होते, अशा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलीस रेकॉर्डनुसार, या पबविरुद्ध आधीही वर्ष 2025 दरम्यान अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीही पबकडून नियमांचे उल्लंघन सुरू होते.
आता बीएनएस (BNS) आणि 'अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा' (Prevention of Immoral Trafficking Act) च्या संबंधित कलमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, "हा छापा ऑपरेशन दरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे टाकण्यात आला होता. पुढील तपास सुरू आहे."
वर्ष 2018 बॅचच्या आयपीएस रिती राज यांनी राबवले ऑपरेशन
दिल्ली पब्लिक स्कुल, पाटणा (2010)च्या विद्यार्थिनी असलेल्या रिती राज यांनी नामांकित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली (2016) मधून पदवी (ग्रॅज्युएशन) शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर नागरी सेवा परीक्षा (युपीएससी) उत्तीर्ण होऊन वर्ष 2018 मध्ये त्या भारतीय पोलीस सेवेत (IPS) रुजू झाल्या. कुकटपल्लीच्या डीसीपी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सायबर गुन्हे आणि हैदराबादच्या सायबराबादमधील माधपूर झोनसह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world