विमा प्रतिनिधीने ठेवीदारांना घातला गंडा, रक्कम ऐकून हैराण व्हाल

बँक प्रतिनिधी म्हणून बँकेत बसणाऱ्या एका भामट्याने छोट्या ठेवीदारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. त्यामुळे ठेवीदार चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मनमाड:

मनमाडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बँक प्रतिनिधी म्हणून बँकेत बसणाऱ्या एका भामट्याने छोट्या ठेवीदारांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. त्यामुळे ठेवीदार चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ठेवीदारांनी बँकेचे कार्यालय गाठत एकच हल्लाबोल केला आहे. त्यानंतर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आपण बँकेचे प्रतिनिधी असून तो ठेवीदारांकडून ठेवी गोळा करत होता. त्याच पैशात त्यांनी अपहार केला आहे. त्याचा आकडाही मोठा आहे. तो ऐकला तर तुम्ही हैरण व्हाल. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

युनियन बँकेच्या मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बँकेच्या मुदत ठेवीदारांचे चांगले धाबे दाणाणले आहेत. त्यानंतर संतप्त ठेवीदारानी बँकेसामोर एकच गर्दी केली होती. संदीप देशमुख असे अपहार करणाऱ्या विमा प्रतिनिधीचे नाव आहे. त्याने शेकडो मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी बेरर चेक घेतले होते. ते स्वतःच्या नावावर परस्पर वटवून  घेत ठेवीदारांना बनावट पावत्याही तयार केल्या.  त्यातून त्याने करोडो रुपयांचा अपहार केला आहे. 

हेही वाचा - भीमा नदी पात्र दुर्घटना : 36 तासांनंतर 3 जणांचे मृतदेह सापडले, तीन अद्याप बेपत्ता!

बँकेतील इतर कर्मचारीही त्यात सहभागी असल्याचा ठेवीदारांचा आरोप आहे. अपहाराची व्याप्ती पाहता बँकेने तातडीने चार जणांचे चौकशी पथक नेमले आहे.  त्यांच्या मार्फत या गैरव्यहाराची चौकशी सुरु केली आहे. ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी ही बँकेने दिली आहे. बँकेमार्फत संबंधित विमा प्रतिनिधी विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात 1 कोटी 39 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी मोठी असून शकते. हा आकडा 25 कोरोड रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. गंडा घालणारा देशमुख सध्या फरार आहे. त्याला तातडीने पकडून ठेवीदारांचे पैसे परत देण्याची मागणी संतप्त ठेवीदारांकडून होत आहे.

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी वाहतूक राहणार बंद, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक

फरार देशमुख हा बँक प्रतिनिधी म्हणून बँकेत बसलेला असायचा असे ठेवीदार सांगतात. बँकेच्या सांगण्यावरूनच आम्ही त्याला आमच्या ठेवी देत होतो. कधी प्रिंटर बंद आहे तर कधी वेळ लागणार आहे असे सांगून तो पोचपावत्या देत नव्हता असेही ठेवीदार सांगत आहे. कोणी दोन लाखाची तर कोणी 45 लाखा पर्यंतचीही ठेव त्याच्याकडे ठेवली होती. मात्र ते पैसे तो परस्पर घेऊन फरार झाला आहे. आपल्या आयुष्याची पुंजी बँकेत सुरक्षित रहावी म्हणून ठेवली होती. पण त्याच्यावरच डल्ला मारल्याने हे ठेवीदर हबकले आहेत. 

Advertisement