जाहिरात
Story ProgressBack

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी वाहतूक राहणार बंद, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक

गॅन्ट्री बसवताना सदर कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या व जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. 

Read Time: 2 mins
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी वाहतूक राहणार बंद, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक

मुंबई-पुणे महामार्गावर 23 मे रोजी दुपारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आज (23 मे 2024) रोजी दुपारी 12 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेदरम्यान करण्यात येणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गॅन्ट्री बसवताना सदर कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणइ जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. वाहनधारकांना ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. 

(नक्की वाचा-  देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?)

पर्यायी  मार्ग कोणते?

  • मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना जुना मुंबई-पुणे मार्गावरून जाता येतील.
  • पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या वाहनांना तसेच बसेसना खोपोली एक्झिट येथून वळवून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्गावरून येतील.
  • पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या व जड-अवजड वाहनांना खालापूर टोल नाक्यांवरुन जुना पुणे - मुंबई  महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका यातून जाता येणार आहे.
  • पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या हलक्या व जड-अवजड वाहनांना पनवेल मार्गे मुंबईच्या दिशेने पुढे जाता येणार आहे.
  • पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहने शेडुंग फाटयावरुन सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Pune Posrshe Accident : 2 जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलीस कोठडी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज दुपारी वाहतूक राहणार बंद, गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक
pune porsche accident case update juvenile court cancel bail minor accused
Next Article
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी, न्यायालयाचा मोठा निर्णय
;