पतीच्या प्राध्यापक मित्रानेच केला घात; पेढा खाऊ घालून गाठली अत्याचाराची परिसीमा

पीडित महिला अनेक दिवस हा अत्याचार सहन करीत होती, अखेर तिने पोलीस स्टेशन गाठलं.

Advertisement
Read Time: 2 mins
यवतमाळ:

पतीच्या एका प्राध्यापक मित्राने विवाहितेच्या पेढ्यात गुंगीचे औषध देऊन आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्यानंतर फोटो वायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमधून समोर आला आहे. ही गंभीर घटना यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस झाली. पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विजेंद्र जाधव असं विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी प्राध्यापक मित्राचं नाव आहे. घटनेनंतर पीडित विवाहितेने अवधूत वाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रितसर तक्रार दिली.  पीडित विवाहित ही पती व दोन मुलांसह अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत राहते. आरोपी हा विवाहितेच्या पतीचा चांगला मित्र असून तो घराशेजारी राहतो. जानेवारी महिन्यात पीडित विवाहिता घरी एकटीच असताना विजेंद्र हा घरी आला. त्यानंतर त्याने प्रसाद म्हणून पेढा खायला दिला. पेढा खाल्ल्यानंतर विवाहितेला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली. काही वेळाने जाग आल्यानंतर आरोपी विजेंद्र हा घरातच बसून होता. यावेळी त्याने विवाहितेला तू मला खूप आवडते,  तुझ्याशी शारीरिक संबंध करायचे आहे, म्हणून तुझे फोटो काढले, अशी बतावणी केली. तसेच शारिरीक संबंध करु दिले नाही तर हे फोटो मी तुझ्या नवऱ्याला दाखवेन किवा व्हायरल करेन अशी धमकी दिली आणि तो तिथुन निघून गेला.

Advertisement

नक्की वाचा - सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने डोक्यात गोळी झाडत स्वत:ला संपवलं, कारण काय?

4 ते 5 दिवसांनी विवाहिता घरी एकटीच असताना फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर देखील घरात कोणी नसताना तो विवाहितेवर अत्याचार करीत होता. दरम्यान रात्री 11 वाजताच्या सुमारास पती नसताना विजेंद्रने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विवाहितेने आरडा ओरडा केला. यावेळी मुले जागी झाल्याने तो पसार झाला. आपली बदनामी होईल या भीतीने पीडितेने आजपर्यंत तक्रार दिली नाही. त्यानंतर आरोपीवर कारवाई व्हावी म्हणून आज अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.

Advertisement

Topics mentioned in this article