जाहिरात

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने डोक्यात गोळी झाडत स्वत:ला संपवलं, कारण काय?

प्रकाश कापडे असे आत्महत्या करणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. ते मुंबईत सेवा बजावत होते. विशेष म्हणजे ते सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत काही काळ तैनात होते.

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने डोक्यात गोळी झाडत स्वत:ला संपवलं, कारण काय?
जळगाव:

जळगावच्या जामनेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका एसआरपीएफ जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यामुळे संपुर्ण जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकाश कापडे असे आत्महत्या करणाऱ्या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. ते मुंबईत सेवा बजावत होते. विशेष म्हणजे ते सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत काही काळ तैनात होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रकाश कापडे हे 8 दिवसापूर्वी जामनेर मध्ये आले होते. बुधवारी पहाटे गणपतीनगर येथील राहत्या घरी त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी जामनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रकाश कापडे यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याकडे ही काही काळ सुरक्षा रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांशी सामना, गुप्त अभियानांचा भाग; गाझात निवृत्त कर्नल वैभव काळेंना वीरमरण

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या घरी प्रकाश कापडे हे सुरक्षारक्षक म्हणून काही काळ तैनात होते. त्यांची नियुक्तीही मुंबईत होते. ते एसआरपीएफमध्ये होते. त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास आता पोलिस करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'बदलापूरच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या' कोणी केली मागणी?
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने डोक्यात गोळी झाडत स्वत:ला संपवलं, कारण काय?
sangali miraj young man attacks by Sharp weapon because insta story
Next Article
इंस्टावर स्टोरी का बघतोस? आधी दमबाजी मग कोयत्याने वार, नक्की काय घडलं?