Pakistani Spy : पाकिस्तानचा मोठा डाव उधळला, राजस्थान जवळच्या बॉर्डरवरील मोठा कट उघड

Pakistani Spy : भारत आणि पाकिस्तानमधील तनावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Pakistani Spy Caught In Jaisalmer : भारत आणि पाकिस्तानमधील तनावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानसाठी गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या 40 वर्षांच्या पठाण खानला अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी पठाण खान पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI साठी गुप्तहेर म्हणून काम करत होता. भारत आणि पाकिस्तान बॉर्डरवरील संवेदनशील माहिती तो शेअर करत होता, अशी माहिती उघड झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पठाण खानसला जैसलमेर जिल्ह्यातल्या मोहनगढ भागातून अटक करण्यात आली आहे. त्याला यापूर्वी एक महिन्यापूर्वी संशयाच्या आधारावर अटक करण्यात आली होती. पण, यंदा तपास यंत्रणांनी बरीच चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादाय गोष्टींचा गौप्यस्फोट झाला आहे. त्याच्याविरोधात ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्टच्या विरोधात जयपूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पाकिस्तानला पाठवत होता फोटो आणि व्हिडिओ

या प्रकरणाच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार पठाण खान सीमेवरील हलचालींवर लक्ष ठेवून होता. या भागातील व्हिडिओ आणि फोटो सातत्यानं पाकिस्तानमध्ये पाठवत असे. ही महत्त्वाची माहिती पुरविल्याबद्दल त्याला पाकिस्तानकडून पैसे मिळत होते. फोन आणि इंटरनेट चॅट्सच्या माध्यमातून पाकिस्तानातील ISI हँडलर्सशी सातत्यानं चर्चा करत असल्याचे पुरावे सापडले आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा :  Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे? )

पाकिस्तानमध्ये गेला होता

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाण खान 2019 मध्ये पाकिस्तानात गेला होता. त्यावेळी त्यानं पाकिस्तानमधील नातेवाईकांची भेट घेतली. त्याचवेळी तो ISI च्या संपर्कात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतामध्ये परतल्यानंतर त्यानं गुप्तहेर म्हणून काम सुरु केलं. 

ADG संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार पठाण खानची अद्याप चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीतून देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. त्याला सध्या जयपूरमध्ये आणण्यात आलं आहे. तिथं गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा एजन्सीची संयुक्त टीम त्याची चौकशी करत आहे. तो कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता तसंच त्यानं आत्तापर्यंत कोणती माहिती पाकिस्तानला पुरवली आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. 
 

Advertisement