Nimisha Priya: आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी परदेशात गेली निमिषा, 16 जुलै रोजी होणार फाशी!

Nimisha Priya: निमिषा प्रिया नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये यमनला गेली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
Nimisha Priya: आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी निमिषा परदेशात गेली होती.
मुंबई:

Nimisha Priya: केरळमधील पलक्कड येथील रहिवासी आणि पेशाने नर्स असलेल्या निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी यमनमध्ये फाशी दिली जाईल. प्रियावर एका यमनच्या नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे, अशी माहिती मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी दिली. तुरुंगात आहे. जेरोम यांच्याकडे निमिषा प्रियाची आई प्रेमा कुमारी यांची 'पॉवर ऑफ अटॉर्नी' (मुखत्यारपत्र) आहे. जेरोम यांनी सांगितले की, तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची तारीख कळवली आहे. त्याचबरोबर निमिषा प्रियालाही याबद्दल अधिकृतपणे कळवण्यात आले आहे. 

सॅम्युअल जेरोम यांनी सांगितले की, चर्चा सुरू होती, परंतु यमनच्या नागरिकाच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. 'ब्लड मनी' (रक्तरक्कम) वरही कोणताही तोडगा निघू शकला नाही. यमनच्या नागरिकाच्या कुटुंबाला 10 लाख डॉलरची (सुमारे 8.3 कोटी रुपये) ऑफर देण्यात आली होती. एका प्रायोजकाच्या मदतीने पैसेही गोळा केले जात आहेत. सूत्रांनुसार, अजूनही पर्याय खुले आहेत. त्याचबरोबर भारत सरकार तिचे प्राण वाचवण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करू शकते.

(नक्की वाचा: Kalyan News: 6 तासांमध्ये आरोपत्र, 35 दिवसांमध्ये निकाल! महिलेबरोबर भयंकर कृत्य करणाऱ्या आरोपीला शिक्षा! )

कोण आहे निमिषा?

केरळमधून आलेली निमिषा प्रिया नर्सिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये यमनला गेली होती. ती आपल्या आई-वडिलांना चांगले आयुष्य देण्यासाठी तेथे गेली होती असे सांगितले जाते, कारण तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सुरुवातीला तिने यमनमधील अनेक रुग्णालयांमध्ये दिवसरात्र काम केले. त्यानंतर तिने स्वतःचे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती 2014 मध्ये तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली. तलालने निमिषाला यमनमध्ये क्लिनिक सुरू करण्यास मदत करण्याचे वचन दिले. निमिषाला वाटले की आता तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

काय आहे प्रकरण?

यमनमधील व्यापार कायद्यानुसार, जो व्यक्ती त्या देशाचा नागरिक नाही, त्याला देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करावी लागते. निमिषाने कायद्यांनुसारच क्लिनिक उघडण्यासाठी भागीदारी केली आणि अटी मान्य केल्या. निमिषाने 2015 मध्ये महदीसोबत तिचे क्लिनिक सुरू केले. पण लवकरच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. तिने महदीवर गैरवर्तन आणि छळाचा आरोप केला होता. महदीने तिचा पासपोर्टही काढून घेतला होता.

Advertisement

(नक्की वाचा: Dombivli: डोंबिवलीतील उलट्या काळजाचा मुलगा, आजारी वडिलांची केली भयंकर अवस्था! )

निमिषाला हवा होता पासपोर्ट

निमिषाने महदीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तिला 2016 मध्ये अटक करण्यात आली. परंतु काही अहवालानुसार, त्याला काही दिवसांनंतरच सोडण्यात आले. 2017 मध्ये हे वाद नवीन वळणावर पोहोचले. आपला पासपोर्ट परत मिळवून भारतात परत येण्यास उत्सुक असलेल्या निमिषाने एका स्थानिक तुरुंग रक्षकाची मदत घेतली, ज्याने महदीला अक्षम करण्यासाठी शामक औषधांचा (sedatives) वापर करण्याचा सल्ला दिला.

त्या रक्षकाचा सल्ला मानून, निमिषाने तिचा पासपोर्ट त्याच्या ताब्यातून मिळवण्याच्या प्रयत्नात त्याला शामक औषधांचे इंजेक्शन दिले. जास्त डोसमुळे त्याचा मृत्यू झाला, ज्यामुळे निमिषाला अटक करण्यात आली आणि या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. 
 

Advertisement