
Kalyan News: महिलांवरील वाढते गुन्हे हा राज्यातील गंभीर प्रश्न आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या प्रकरणाचा निकाल अनेकदा लवकर लागत नाही. ही पोलिसांसमोरील मोठी डोकेदुखी असते. पण, कल्याणमधल्या कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या कोर्टानं 35 दिवसांमध्ये एका आरोपीला एक वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा दिली आहे. या प्रकरणात इतक्या लवकर शिक्षा होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या घरात घुसून ओमकार निकाळजे नावाच्या तरुणाने तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने 3 जून 2025 रोजी या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
(नक्की वाचा : Drug Racket: KDMC ड्रग्ज तस्कारांचा नवा अड्डा! डोंबिवलीतील आणखी एका घरात सापडला 2 कोटींचा साठा )
ल्याणचे डीसीपी अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे, वरि्ष्ठ पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अमित पवार यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या 6 तासांमध्ये संबंधित आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले.
त्यानंतर या प्रकरणात 5 जून 2025 पासून कोर्टात सुनावणी सुरु झाली. जवळपास 33 दिवस या प्रकरणाची सुनावणी सुरु हाेती. कल्याण कोर्टाचे न्यायाधीश आरती शिंदे यांच्याकडे ही सुनावणी सुरु होती. सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रकाश सपकाळे यांनी या प्रकरणात बाजू मांडली.
( नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीतील उलट्या काळजाचा मुलगा, आजारी वडिलांची केली भयंकर अवस्था! )
अखेर 8 जुलै मंगळवारी दुपारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 74 अंतर्गत आरोपी ओमकार निकाळजे याला एक वर्ष सक्त मजूरीची शिक्षा आणि बीएनएस कलम 329 ,( 3) अंतर्गत एक महिना साध्या कारवासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडापैकी 2500 फिर्यादी यांना आणि 2500 रुपये सरकारी जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world