जाहिरात

Trending News : ग्राफिक डिझायनर झाला चोर,जोडीला भावी डॉक्टर;'बंटी-बबली'च्या भयंकर प्लॅननं पोलिसही चक्रावले

Trending News : एका 18 वर्षांच्या ग्राफिक डिझायनर मुलाने आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण मुलीने मिळून असं काही केलं की संपूर्ण पोलीस प्रशासन चक्रावून गेलं.

Trending News : ग्राफिक डिझायनर झाला चोर,जोडीला भावी डॉक्टर;'बंटी-बबली'च्या भयंकर प्लॅननं पोलिसही चक्रावले
प्रतिकात्मक फोटो
मुंबई:

Trending News : एका 18 वर्षांच्या ग्राफिक डिझायनर मुलाने आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण मुलीने मिळून असं काही केलं की संपूर्ण पोलीस प्रशासन चक्रावून गेलं. फिल्मी पडद्यावर आपण अनेकदा जोडीदारांना चोरी करताना पाहतो, पण खऱ्या आयुष्यातही असाच काहीसा प्रकार घडला आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात या तरुण जोडीने चक्क 'बंटी आणि बबली' बनण्याचा निर्णय घेतला आणि 16 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

काय आहे प्रकरण?

मध्यप्रदेशातील इंदूर शहरातील हा संपूर्ण प्रकार आहे. राऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित ज्वेलरी शॉपमध्ये ही मोठी चोरी झाली होती. एका बाजूला उज्ज्वल भविष्य समोर असताना या दोन तरुणांनी गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवल्याने इंदूरमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे.

एआयमुळे नोकरी गेली आणि....

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा एक ग्राफिक डिझायनर आहे. तो एका आयटी कंपनीत पार्ट टाइम काम करत होता. मात्र, सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा प्रभाव वाढत आहे. याच तंत्रज्ञानामुळे या मुलाची नोकरी गेली आणि तो बेरोजगार झाला. 

हाताला काम नसल्याने आणि घरची ओढाताण होत असल्याने त्याने आपली बालपणीची मैत्रीण, जी सध्या नीट परीक्षेची तयारी करत आहे, तिला सोबत घेतले. दोघांनी मिळून हिंदी चित्रपट बंटी और बबली पाहिला आणि त्यातून प्रेरणा घेऊन चोरीचा प्लॅन तयार केला.

( नक्की वाचा : Pune News : शाळेच्या वॉशरुमध्ये मैत्रिणीला.. तर शिक्षिकेला केले प्रपोज, विद्यार्थिनीच्या प्रतापाने पुणे हादरले )
 

16 लाख रुपयांचे दागिने लंपास

22 डिसेंबरच्या रात्री या दोघांनी ठरल्याप्रमाणे दागिन्यांचे दुकान फोडले आणि तिथून 16.17 लाख रुपये किमतीचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने चोरले. चोरी केल्यानंतर दोघेही शहरातून गायब झाले आणि भोपाळला जाऊन लपले. या तरुण वयात इतकी मोठी चोरी करूनही त्यांना ते दागिने विकणे मात्र कठीण झाले होते.

चोरीचा माल घेऊन हे दोघे अनेक ज्वेलर्सकडे गेले, पण त्यांचे 18 वर्षांचे वय पाहून कोणालाही त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. लोक त्यांना लहान समजत होते आणि दागिन्यांची खूपच कमी किंमत लावत होते. त्यामुळे त्यांनी ख्रिसमसच्या सुट्ट्या संपल्यावर हे दागिने विकण्याचे ठरवले. पण त्याआधीच इंदूर पोलिसांनी त्यांचा माग काढला आणि भोपाळमधून त्यांना अटक केली.

( नक्की वाचा : Mumbai Crime : डेटिंग ॲपवर भेटली, लग्नाचं स्वप्न दाखवलं आणि 53.30 लाखांना गंडा घालून 'ती' गायब )
 

पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण लालचंदानी यांनी सांगितले की, या दोघांनी केवळ झटपट पैसा कमावण्यासाठी हे पाऊल उचलले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा सर्वच्या सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com