राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
IPS Bhagyashree Navtake : आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवटक्के यांच्यावर विनाकारण तीन गुन्हे नोंदवण्याचा आरोप आहे. या प्रकरणात इतर पोलीस अधिकाऱ्यांनाही सहभागी करण्यात आले आहे, असा आरोप असून त्यामुळे पुणे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत भाग्यश्री नवटक्के?
भाग्यश्री नवटक्के या भाईचंद हिराचंद रायसोणी प्रकरणाच्या दरम्यान पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. प्रकरणात त्यांनी विनाकारण तीन गुन्हे नोंदवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नवटक्के काही वर्षांपूर्वी नवटक्के यांनी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्यानं त्या अडचणीत सापडल्या होत्या. त्यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची बीडवरून छत्रपती संभाजीनगरला बदली करण्यात आली होती. नवटक्के पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी नवटके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : पुण्यात बँक खाते भाड्यानं घेऊन सुशिक्षितांची फसवणूक, 8 महिन्यांमध्ये 278 कोटी लुबाडले )
भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणातील अपडेट
या प्रकरणात सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या पतपेढीविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपाचे जळगावमधील विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापााठोपाठ या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नवटक्केंवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अद्याप काही आणखी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.