MBBS तरूणीचं टोकाचं पाऊल, नदीत घेतली उडी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

ब्रम्हपुरी इथे इशा घनश्याम बिंजवे ही तरूणी राहात होती. ती अवघ्या 24 वर्षाची होती. तीने एमबीबीएस केले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीमध्य एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ तर धक्कादायक आहे. ब्रम्हपुरी इथे इशा घनश्याम बिंजवे  ही तरूणी राहात होती. ती अवघ्या 24 वर्षाची होती. तीने एमबीबीएस केले होते. तिने  नदीत उडी मारून आत्महत्या केलीय. तिचा आत्महत्या करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इषा बिंजवे ही तरूणी चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीची रहीवाशी होती. तिने एमबीबीएस केले होते. पेशाने ती डॉक्टर होती. ती आत्महत्या करण्याच्या उद्देशाने वैनगंगा नदीच्या पुलावर पोहोचली. तिथून तिने थेट वाहत्या पाण्यात उडी घेतली. पण पाणी कमी असल्याने ती वाचली. तिचा पहिला प्रयत्न असफल ठरला. पण आत्महत्या करायचीच हे ती ठरवून आली होती. त्यामुळे तिने दुसरा प्रयत्न केला. यावेळी तिने खोल पाण्यात उडी घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - कोल्हापुरात कलम 163 लागू, 'या' गोष्टी करण्यावर आलीय बंदी

खोल पाण्यात उडील घेतल्यानंतर ती पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत जावू लागली. ती पाण्याच गटांगळ्या खात होती. त्यावेळी वैणगंगेच्या पुलावर लोकांनी गर्दी केली होती. तिथल्या लोकांनी ती वाहात जात असल्याचा व्हिडीओ काढला. काहींनी फोटो घेतले. पण तिच्या मदतीला मात्र कोणी धावून गेले नाही. त्या पैकी कोणालाही तिला वाचवावे असे वाटले नाही. त्यानंतर ती पाण्या खाली गेली ती वर आलीच नाही. 

ट्रेंडिंग बातमी - 12 दिवसापासून जळगावचा तरूण अमेरिकेत बेपत्ता, मित्रांबरोबर गिर्यारोहणासाठी गेला पण...

या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नदीत तिला शोधण्याचे काम सुरू झाले. शोधमोहीमे वेळी पोलिसांच्या हाती तिचा मृतदेह लागला. तो बाहेर काढण्यात आला. तिन नेमकी कशा मुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही. त्याचा शोध आता पोलिस घेत आहेत. या घटनेनंतर तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. शिवाय एक तरूण डॉक्टर गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Advertisement