Son Killed Mother Viral CCTV Footage: राजस्थानमधील जयपूरमध्ये (Jaypur) एका व्यक्तीने स्वतःच्या आईची हत्या केल्याची एक भयानक घटना समोर आली आहे. घरामध्ये वायफायवरुन झालेल्या वादातून मुलाने आईला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. वडील आणि बहीण मध्यस्थी करण्यासाठी आले तेव्हा आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला. मुलाने आईचा गळा दाबला आणि नंतर तिच्या डोक्यावर काठीने वार केला, ज्यामुळे ती जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.
समोर आलेल्या माहितीनुसार, मृत महिला संतोष आणि तिचा पती लक्ष्मण सिंग मूर्ती हे मूळचे हरियाणाचे होते. ते सध्या निवारु रोडवरील वैद्यजी चौकाजवळ अरुण कॉलनीत राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा काही अंतरावर वेगळा राहतो, तर त्यांचा मुलगा नवीन आणि दोन मुली त्यांच्यासोबत राहतात. या भयंकर घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी आई आणि मुलगा सकाळपासूनच भांडत होते. दुपारी आई आणि मुलामध्ये वाय-फाय कनेक्शनवरून भांडण झाले. रागाच्या भरात, आरोपी नवीनने त्याच्या आईचा गळा दाबला आणि नंतर तिच्या डोक्यावर काठीने वार केले. जोराचा मार लागल्याने ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे वडील लक्ष्मण सिंग हे १० वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते. नवीनने २०२० मध्ये लग्न केले आणि सहा महिन्यांनंतर त्याची पत्नी त्याला सोडून गेली. त्याच्याविरुद्ध हुंडा मागितल्याचा आणि छळाचाही आरोप करण्यात आला आहे. मुलगा नवीन याने किरकोळ कारणावरून त्याच्या आईचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी शवविच्छेदन केले आहे आणि मृतदेह कुटुंबाला सोपवला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. सध्या नवीन पोलिस कोठडीत आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. (Son Killed Mother CCTV Footage)
नक्की वाचा - Virar News: गाईंना छोट्याशा कारमध्ये कोंबलं; गावकऱ्यांच्या एन्ट्रीमुळे चालकाचं दुष्कृत्य उघड, धक्कादायक प्रकार