एडसग्रस्त महिलेची पतीवर शरीर संबंधासाठी जबरदस्ती, उघडकीस आला भयंकर कट

राजस्थानातही एक अशीच घटना घडली आहे. राजस्थानातील एका न्यायालयात एका माणसाने बायकोविरोधात खटला दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जयपूर:

विवाहबंधन हे पवित्र बंधन मानलं जातं. विवाहानंतर नवरा बायको जन्मजन्मांतरीचे साथीदार बनतात. दोघे एकमेकांना खूश ठेवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतात असं म्हटलं जातं. मात्र अशा अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यांनी नवरा अथवा बायकोच्या नात्याला काळिमा फासला आहे. राजस्थानातही एक अशीच घटना घडली आहे. राजस्थानातील एका न्यायालयात एका माणसाने बायकोविरोधात खटला दाखल केला आहे. याचिकेमध्ये नवऱ्याने म्हटलंय की त्याची बायको त्याच्यावर सतत शरीरसंबंध ठेवण्यासाठी  जबरदस्ती करत होती. सुरक्षित शरीरसंबंधासाठी नवरा गर्भनिरोधकाचा वापर करूया असं नवरा बायकोला सांगत होता मात्र बायको त्याला नकार देत होती. यामुळे आपल्याला भयंकर त्रास सहन करावा लागल्याचे नवऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. 

नक्की वाचा : बायको नको त्या अवस्थेत दिसली, सोबतच्या तरुणाला पाहून नवरा हादरला

आपल्या बायकोला एचआयव्हीची लागण झाली असल्याचं कळाल्यानंतर नवरा हादरला होता. हे माहिती असूनही ती त्याच्यावर शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करत होती. यामुळे नवऱ्याने बायकोविरोधात पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. नवऱ्याने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्याची बायको त्याच्यावर शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होती. आपल्याप्रमाणेच नवऱ्यालाही एचआयव्हीची लागण व्हावी हा बायकोने कट रचला होता. बायकोच्या या कटाबद्दल कळाल्यानंतर नवऱ्याने तिचा मोबाईल तपासला. यामध्ये त्याला एक नंबर सापडला, हा नंबर या महिलेच्या मित्राचा निघाला. नवऱ्याने या मित्राला फोन केल्यानंतर कळालं की त्यालाही एचआयव्हीची लागण झाली होती. 

नक्की वाचा : महिला अँकरकडे पाहात झाकीर नाईक म्हणाला की….

31 मार्च रोजी नवरा आणि बायको दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालामध्ये बायकोला एचआयव्हीची लागण झाली असल्याचे निदान झाले होते. नवऱ्याला मात्र एचआयव्हीची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपली बायको घरातील सगळे दागिने घेऊन फरार झाल्याचे नवऱ्याने म्हटले आहे. आपल्याप्रमाणेच नवऱ्यालाही एचआयव्हीची लागण व्हावी जेणेकरून आपल्यावर कोणाला संशय येणार नाही असा बायकोने कट रचला होता.   

Topics mentioned in this article