जाहिरात

बायको नको त्या अवस्थेत दिसली, सोबतच्या तरुणाला पाहून नवरा हादरला

जेव्हा नवऱ्याला बायकोसोबतचा तरुण दिसला तेव्हा त्याला धक्काच बसला.

बायको नको त्या अवस्थेत दिसली, सोबतच्या तरुणाला पाहून नवरा हादरला
नवी दिल्ली:

हरियाणातील करनालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. करनालमधील गगसीनामध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणाची उकल करणारे पोलीसही घटनेमुळे हादरले आहेत. एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या केली. नवऱ्याने या दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं होतं. आपलं पितळ उघडं झाल्याने घाबरलेल्या महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून नवऱ्याची हत्या केली. आरोपी महिला ही 3 मुलांची आई असून तिचे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाच्यासोबतच होते प्रेमसंबंध

नवऱ्याने त्याच्या बायकोला एका तरुणासोबत पकडले होते. हे दोघेही आक्षेपार्ह स्थितीत असताना नवऱ्याने दोघांना रंगेहात पकडले होते. जेव्हा नवऱ्याला बायकोसोबतचा तरुण दिसला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण तो तरुण नवऱ्याच्या बहिणीचा मुलगा होता. संजीत हा रखवालदार होता. काम संवपून तो जेव्हा घरी आला तेव्हा त्याला त्याची बायको सविता आणि त्याचा भाचा अमित हे दोघे आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसले. या दोघांना पकडल्यानंतर सविता आणि संजीतमध्ये जबरदस्त भांडण झालं. संजीतचा राग आल्याने सविताने अमितच्या मदतीने संजीतचा गळा आवळून खून केला. यानंतर अमित आणि सविताने संजीतचा मृतदेह ऊसाच्या शेताशेजारी असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिला. 

नक्की वाचा : तुरुंगात होणाऱ्या रामलीलेत 2 कैदी झाले वानर, सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले अन् परतलेच नाही!

पोलीस तपासात उघडकीस आल्या धक्कादायक बाबी

संजीत गायब झाल्याची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी शोध सुरू केला असता त्यांना संजीतचा मृतदेह विहिरीत सापडला होता. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये संजीतचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे कळाले. पोलिसांनी संजीतच्या घरच्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. तपासामध्ये त्यांना सवितावर संशय यायला लागला होता. सविताची कसून चौकशी केली असता त्यांना कळाले की तिचं आणि संजीतचं भांडण झालं होतं. अमितसोबत सविताच्या असलेल्या अनैतिक संबंधांबाबतबही पोलिसांना कळालं. यामुळे पोलिसांनी सविता आणि अमित या दोघांनाही अटक केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: