Shocking: 9 वर्षांची चिमुरडी 45 मिनिटे कळवळत राहिली; पण शिक्षकांनी ... 'त्या' आत्महत्येवर धक्कादायक खुलासा

Student Suicide Case : 9 वर्षांच्या शाळकरी मुलीने शाळेच्याच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या तपास समितीने एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Student Suicide Case : CBSE च्या अहवालात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.
मुंबई:

Student Suicide Case : शाळेत मुलांच्या सुरक्षेची आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल, या विश्वासाने प्रत्येक पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवतो. पण, जेव्हा शिक्षकांचे दुर्लक्ष एका लहानग्या जीवासाठी 'जीवघेणे' ठरते. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राजस्थानची राजधावी जयपूरमध्ये 9 वर्षांच्या शाळकरी मुलीने शाळेच्याच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या तपास समितीने एक धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, आत्महत्या करण्यापूर्वी या निरागस मुलीने तब्बल 45 मिनिटे तिच्या वर्गमित्रांकडून होणाऱ्या छळाबद्दल आणि वाईट शब्दांबद्दल शिक्षकांकडे मदतीची याचना केली होती. मात्र, तिची ही विनवणी पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली!

तक्रारीकडे 45 मिनिटे दुर्लक्ष

चौकशी समितीने 3 नोव्हेंबर रोजी शाळेची पाहणी केली आणि 11 नोव्हेंबर रोजी चिमुरडीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांशी चर्चा केली. समितीच्या अहवालानुसार, आत्महत्या करण्यापूर्वी अमायराने सुमारे 45 मिनिटे तिच्या वर्गमित्राच्या ‘खराब शब्दां'बद्दल शिक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र, तिची ही विनंती पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली.

( नक्की वाचा : Triple Murder नीलगाय नव्हे, कुटुंब पुरले! वन अधिकाऱ्याने कशी आणि का केली पत्नी-मुलांची हत्या, वाचा थरारक कहाणी )
 

अहवालात स्पष्ट केल्याप्रमाणे, वर्गशिक्षिका पुनीता शर्मा यांनी कबूल केले की पीडित मुलीनं वर्गमित्राने वापरलेल्या 'खराब शब्दां'बद्दल त्यांना सांगितले होते. मृत मुलीच्या आई-वडिलांनी शाळेत मुलांकडून होणारी ‘बुलींग' (छळ) आणि चिडवण्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही केल्या होत्या, पण शाळेने त्याकडे लक्ष दिले नाही.एका निष्पाप विद्यार्थीनीला 'अतिशय मानसिक त्रास आणि छळ' सहन करावा लागला आणि अखेरीस तिचा जीव गेला, यासाठी शाळेने सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचा निष्कर्ष CBSE च्या अहवालात देण्यात आला आहे.

Advertisement

पुराव्यांशी छेडछाड आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन

तपास समितीला अनेक गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. त्यामध्ये,

  • अमायरा ज्या ठिकाणी खाली पडली, ती जागा फॉरेन्सिक तपासणी होण्यापूर्वीच धुवून टाकण्यात आली होती. यामुळे संभाव्य पुरावे नष्ट झाले, जे पुराव्यांशी छेडछाड असल्याचे स्पष्ट संकेत देतात.
  • चौथ्या इयत्तेत शिकणारी अमायरा तळमजल्यावरून (Ground Floor) कोणाच्याही नजरेत न येता थेट चौथ्या मजल्यावर पोहोचली.
  • शाळेच्या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी स्टीलचे सुरक्षा जाळी (Safety Nets) बसवलेले नाहीत.
  • सीसीटीव्ही फुटेजवर नियमितपणे लक्ष ठेवण्यासाठी शाळेत कोणताही कायमस्वरूपी कर्मचारी (Staff) नेमलेला नव्हता.

शिक्षकांकडून सहकार्य नाही, बेकायदेशीर बांधकाम

मृत चिमुरडीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या आणखी काही गोष्टी अहवालात स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये,

या चिमुरडीनं 45 मिनिटांच्या कालावधीत पाच वेळा वर्गमित्रांच्या 'गलत शब्दां'बद्दल तक्रार केली. तिला मदत मिळण्याऐवजी, तिच्यावर ओरडले गेले आणि तिला वर्गातून बाहेर काढण्यात आले. स्वतः शिक्षिकेने 2 नोव्हेंबर रोजी पोलिसांसमोर (SHO) कबूल केले की, वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही.

( नक्की वाचा : Shocking : 'प्लीज मला शाळेत पाठवू नका.." 9 वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येपूर्वीचा रडका Audio, शाळेवर गंभीर आरोप )
 

शाळेच्या इमारतीमध्ये सुरक्षा नियमांनुसार परवानगी असलेल्या मजल्यांपेक्षा अधिक मजले बांधण्यात आले आहेत. तसेच, जिन्याच्या रेलिंगची उंची कमी आणि धोकादायक आहे, ज्यामुळे त्यावर सहज चढणे शक्य होते.

Advertisement

समिती आणि नियमांचे उल्लंघन

शाळेत सेफ्टी आणि सिक्युरिटी कमिटी नव्हती. तसेच, अँटी-बुलींग कमिटी असूनही गेल्या दीड वर्षात अनेक तक्रारी मिळाल्यानंतरही पालकांशी संपर्क साधण्यात आला नाही, जे CBSE च्या परिपत्रकाचे (Circular) उल्लंघन आहे.

मानसिक तणावाची लक्षणे दिसत असतानाही, मृत चिमुरडीला कधीही समुपदेशकाकडे पाठवले गेले नाही.  घटनेच्या दिवशीही नाही आणि पूर्वीच्या तक्रारींदरम्यानही नाही. हे बाल संरक्षण (Child Protection) आणि पॉक्सो (POCSO) समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे.

Advertisement

कथितरित्या, घटनेच्या वेळी संबंधित मजल्यावरील कर्मचारी (Floor Attendant) कर्तव्यावर नव्हता आणि त्याने चिमुरडीला बाल्कनीवर चढताना पाहिले नाही. इतकंच नाही तर तपासणीदरम्यान अनेक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आयडी कार्ड्स (ID Cards) घातले नव्हते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ओळख पटण्यास विलंब होऊ शकतो, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

या मुलीच्या पालकांनी शाळेचे संलग्नत्व (Affiliation) रद्द करण्यासह कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. CBSE च्या अहवालामुळे आता शाळा व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे.

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Topics mentioned in this article