Jalgaon Crime: तरुणाला संपवलं, अपघात दाखवून विम्याचे 98 लाख लाटले; जळगावमधील भयंकर मर्डर मिस्ट्री

Jalgaon Crime Story: यासंदर्भात विमा कंपन्यांकडून देखील पोलिसांनी माहिती मागवली असून या प्रकरणात अजून नेमकं काय तथ्य समोर येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

जळगाव: आजारी तरुणाची हत्या करुन अपघाती मृत्यूचा बनाव करत 3 जणांनी विमा कंपनीकडून 98 लाख रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधून ससमोर आली आहे. या प्रकरणात आता तब्बल दीड वर्षांनी  आजारी तरुणाच्या चुलत बहिणीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर वरणगाव पोलिसांनी 3 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

22 महिन्यापूर्वी काय घडलं होतं ? 

जळगाव शहरातील मीराबाई नगर पिंप्राळा भागात राहणाऱ्या 38 वर्षीय शरद किसन जगताप हा तरुण रक्ताशय व यकृताच्या आजारामुळे जळगावमधील एका रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आजारी तरुण 28 मे 2023 रोजी कोमात गेला. तरुण कोमात गेल्याची संधी साधत संशयीत राजू गुजारे (वाणी) याने तरुणाच्या नातेवाईकांना विम्याचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाच्या अपघाताचा रुग्णवाहिका चालकासह इतर एका साथीदारांच्या मदतीने कट रचला. 

Advertisement

28 मे 2023 रोजी भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळ मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून तरुणाचा अपघात झाल्याचा या तीनही संशयितांनी बनाव रचला. व भुसावळ वरून मुक्ताईनगरकडे सदर तरुण जात असताना वरणगाव जवळ तरुणाचा अपघात झाल्याचे दर्शवले. त्याचवेळी मुक्ताईनगरकडून जळगाव कडे येणारी रुग्णवाहिका चालक संशयित योगेश वाणी अपघातस्थळी थांबून मृत तरुण शरद जगताप यास रुग्णवाहिकेद्वारे वरणगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न

वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये शरद जगताप या तरुणाचा सर्व विच्छेदन करण्यात आलं यात तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. अपघातानंतर संशयितांनी मृत तरुण शरद जगताप याच्या एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या विम्याची भरपाई 83 लाख व दुचाकीच्या अपघाताचा विम्याची रक्कम 15 लाख रुपये मिळवले. दोन्हीही विम्याची रक्कम ही मृत तरुणाच्या पत्नीच्या नावे असलेल्या संयुक्त बँक खात्यात विमा कंपनीकडून जमा करण्यात आली, मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित राजू गुजारे (वाणी) याने बँक पासबुक व बँकेत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाचे सिम आपल्याकडे घेऊन विम्याची रक्कम लंपास केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

Advertisement

28 मे 2023 रोजी झालेल्या अपघाताप्रकरणी वरणगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र याप्रकरणी मृत तरुण शरद जगताप यांच्या चुलत बहिणीने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केल्याने या घटनेचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी आता वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये मुख्य संशयीत राजू गुजारे (वाणी), रुग्णवाहिका चालक योगेश वाणी, व घनश्याम सपकाळे या तीन जणांविरोधात खुनाचा गुन्हा, तसेच खुनाचा कट रचने असा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.  याप्रकरणी पोलिसांकडून आता सखोल चौकशी केली जात आहे. तसेच यासंदर्भात विमा कंपन्यांकडून देखील पोलिसांनी माहिती मागवली असून या प्रकरणात अजून नेमकं काय तथ्य समोर येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Murder Case: 'जगमित्र' कार्यालय खंडणीचा अड्डा.. धनंजय मुंडेंविरोधात सर्वात मोठा पुरावा सापडला?