Jalgaon News: सेम टू सेम 'सैराट'! आंतरजातीय प्रेमविवाहचा थरकाप उडवणारा शेवट, भावानेच बहिणीला केलं विधवा

प्रशांत उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली. आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

जाहिरात
Read Time: 3 mins
जळगाव:

मंगेश जोशी 

Honour Killing: जात जाता जात नाही अशी स्थिती आज ही महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्यातून एक भयंकर कांड समोर आलं आहे. आंतरजातीय प्रेम विवाह करण्याची शिक्षा एका जोडप्याला मिळाली आहे. जळगाव जिल्ह्याला हादरवून टाकणारी ही घटना समोर आली आहे. काही महिन्यापूर्वीच  प्रशांत चौधरी या 26 वर्षाच्या तरुणाने पळून जावून दुसऱ्या जातीतल्या मुलीसोबत लग्न केलं होतं. त्यांचं हे लग्न मुलीच्या कुटुंबीयांना खास करून भावाला मान्य नव्हतं. तिथूनच खरा प्लॅन शिजला. पुढे या नव्याने जोडलेल्या नात्याचा थरकार उडवणारा शेवट झाला.    

प्रशांत चौधरी याने काही महिन्यापूर्वीच आंतरजातीय विवाह केला होता. दोघांची ही जात वेगळी होती. त्यामुळे घरून लग्नास विरोध होता. त्यामुळे प्रशांतने पळून जावून लग्न केले. याची माहिती मुलीच्या घरच्यांना समजली. त्यावेळी त्यांनी संयम पाळला. योग्य वेळेचा वाट पाहीली. मुलीच्या भावाने त्यासाठी खास प्लॅन आखला होता. त्याच्या डोक्यात सनक होती. बहीणीचा आंतरजातीय विवाह त्याला मान्य नव्हता. त्यातून त्याला बदला घ्यायचा होता. त्याने शांत डोक्याने सर्व काही ठरवलं होतं. 

Advertisement

नक्की वाचा- Pune News: सिंहगडावर जाण्यास पर्यटकांना बंदी, 'या' 3 कारणांमुळे घेण्यात आला निर्णय, बंदी किती दिवस?

लग्नाला काही महिने झाले होते. त्यामुळे प्रशांतला ही वाटले की पत्नीच्या घरच्यांनी हे लग्न मान्य केले आहे. त्याच वेळी  प्रशांतला त्याचा मेहूणा अभिषेक संतोष मोरे याने संपर्क केला. प्रशांतला ही सर्व काही सुरळीत झाले असं वाटलं. अभिषेक प्रशांत सोबत गोडगोड बोलू लागला. पण त्याच्या मनात काही तरी वेगळेच सुरू होते. याची तिळमात्र कल्पनाही प्रशांच्या मनाला नव्हती. त्याने सर्व काही चांगलं होत आहे असं समजून अभिषेक म्हणजेच आपल्या मेहूण्यावर विश्वास ठेवला. याच विश्वासाचा घात पुढे अभिषेकने केला. 

नक्की वाचा - Unique Story: एका राज्यात किचन तर दुसऱ्या राज्यात बेडरूम! महाराष्ट्रातल्या 'या' कुटुंबाची मजेशीर कथा

27 जुलैला अभिषेकने प्रशांत सोबत संपर्क केला. त्याला भेटायला बोलावले. प्रशांत ही अभिषेकला भेटण्यासाठी गेला. त्यानंतर अभिषेकने मद्यपान करण्याच्या बहाण्याने प्रशांतला एका जंगलात नेले. तिथे गोडबोलून त्याला दारू पाजली. त्यानंतर त्याच्या सोबत वाद घातला. हा वाद वाढला. त्याच वेळी अभिषेकने जवळचाच मोठा दगड प्रशांतच्या डोक्यात घातला. त्याने त्याचे डोके अक्षरश: चेचले. प्रशांत मेला असं त्याला वाटले. त्यामुळे त्याने त्याला जंगलातल्या एका खड्ड्यात फेकला. त्यावर काही पाला पाचोळा टाकला. त्यानंतर प्रशांतचीच मोटरसायकल घेवून तिथून पोबारा केला. प्रशांत उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली. आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

नक्की वाचा - Friendship Day : रक्ताचं नातं नसताना ही जपलं मैत्रीचं नातं! डॉक्टर दाम्पत्याच्या एका निर्णयानं आयुष्य बदललं

शोधाशोध केल्यानंतर प्रशांत जंगलात आढळून आला.त्यावेळी प्रशांत जिवंत होता. तिथून त्याला तातडीने जळगावमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर इथं घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहूणा अभिषेक याला ताब्यात घेतले आहे. शिवाय त्याच्याकडून मोटरसायकल ही जप्त करण्यात आली आहे. जामनेर फत्तेपूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.