जाहिरात

Pune News: सिंहगडावर जाण्यास पर्यटकांना बंदी, 'या' 3 कारणांमुळे घेण्यात आला निर्णय, बंदी किती दिवस?

अनेक वेळा सिंहगडावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात.

Pune News: सिंहगडावर जाण्यास पर्यटकांना बंदी, 'या' 3 कारणांमुळे घेण्यात आला निर्णय, बंदी किती दिवस?
पुणे:

पावसाळ्यात अनेक पर्यटकांची पावलं आपोआप पुण्यातील सिंहगडाकडे वळतात. पुणेकरांचे तर हे हक्काचे पर्यटन स्थळ. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर अनेक गड प्रेमी ही जात असतात. त्यात शनिवार रविवार असेल तर सिंहगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र या गडावर जाण्यास पर्यटकांना सध्या बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाआहे. 

पावसाच्या रेड अलर्टमुळे सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 1-2 ऑगस्टला हा किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात हवामान विभागाच्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. या  पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला  पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक किल्ल्यावर येतात.  मात्र रेड अलर्ट असल्याने किल्ल्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यावर दरड व दगड कोसळण्याचा धोका वाढला आहे.  

नक्की वाचा - Unique Story: एका राज्यात किचन तर दुसऱ्या राज्यात बेडरूम! महाराष्ट्रातल्या 'या' कुटुंबाची मजेशीर कथा

अनेक वेळा सिंहगडावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा विषय निर्माण झाला आहे. त्यांची सुरक्षा लक्षात घेताल गडावर जाण्यास बंदी घातली आहे. पुणे वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. शिवाय नागरिकांनी सिंहगड परिसरात जाणे टाळावे. प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे या भागातली स्थिती थोडी बिघडते. शिवाय पर्यटकांमध्ये काही जण हुल्लडबाजी करणारे ही असतात. 

नक्की वाचा - Rain News: ऑगस्ट महिन्यात किती पाऊस पडणार? हवामान विभागाने टेन्शन वाढवलं; काय आहे अंदाज?

या सर्व गोष्टींचा विचार करता दोन दिवसांसाठी सिंहगडावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार कधी सिंहगडावर जाता येईल हे ही स्पष्ट होणार आहे. तुर्तास तरी सिंहगड पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी सिंहगडावर जावू नये असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने ही पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.     

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com