Jalna Crime: प्रेमविवाह केलेल्या सूनेचा भयंकर कांड! दरवाजा उघडताच पोलीस हादरले, गोणीत मृतदेह अन्...

Jalna Crime News: प्रियदर्शनी सोसायटीत घडलेल्या या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर सून फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण, सोळुंके, जालना:  सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन घरात आलेल्या सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना जालना शहरात घडली आहे. जालन्याच्या भोकरदन नाका परिसरातील  प्रियदर्शनी सोसायटीत घडलेल्या या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर सून फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मृत सविता शिंगारे यांच्या आकाश शिंगारे या मुलाचा सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतिक्षा या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. प्रेम विवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह जालन्यातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या प्रियदर्शनी सोसायटीत राहत होता. नोकरीनिमित्त तो लातूर या ठिकाणी असताना त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या सासू- सुना सोबत राहत होत्या.

मंगळवारी रात्री प्रतीक्षाने सासू सविता शिंगारे यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला. हत्येनंतर तिने त्यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला. मात्र गोणीमधून मृतदेह बाहेर नेता येत नसल्याने तो तसाच टाकून ती फरार झाली. सकाळी घराच्या मालकाला संशय येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली अन् जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)

पोलिसांनी घर उघडून पाहताच सविता शिंगारे यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण हादरुन गेले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्येनंतर सून प्रतीक्षा शिंगारे फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. 

Advertisement

दरम्यान, सूनेने आपल्या सासूला इतक्या निर्घृणपणे का संपवले? या हत्येत आणखी कोणाचा सहभाग होता का? असे अनेक सवाल उपस्थित होत असून यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन घरी आलेल्या सूनेने इतक्या भयंकरपणे सासूला संपवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Kolhapur News: छत्रपतींच्या पुतळ्यावरुन प्रशासन- शिवप्रेमी आमनेसामने! गावात तणाव अन् 144 कलम लागू, कुठे घडला प्रकार?