जाहिरात

Kolhapur News: पट्टनकोडोलीत शिवरायांचा पुतळा राहणार पण... एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर प्रशासनाची माघार

Kolhapur Pattankodoli Chhatrapati Shivaji Maharaj Statue: शासनाने आक्षेप घेत तो पुतळा हटवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. ज्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले असून गावामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Kolhapur News: पट्टनकोडोलीत शिवरायांचा पुतळा राहणार पण... एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर प्रशासनाची माघार

विशाल पुजारी, कोल्हापूर: कोल्हापुर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता, ज्यावर प्रशासनाने आक्षेप घेत तो पुतळा हटवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. ज्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले असून गावामध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  पट्टणकोडोली या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्यानंतर प्रशासनाने कारवाईची भूमिका घेतलेली. हा पुतळा परवानगी न घेता उभारल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली. मात्र आता  थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये हस्तक्षेप करत प्रशासनाला हा पुतळा मंडप घालून जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर हा रीतसर परवानगी घेऊन हा पुतळा खुला करा असे आदेशही शिंदे यांनी दिलेत.  

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला. विशेष म्हणजे हा पुतळा एका रात्रीत उभारलेला. गुढीपाडव्या दिवशी अचानक सकाळी या पुतळ्याभोवती शिवप्रेमी जमल्यानंतर ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यानंतर लगेचच ज्या चौकात हा पुतळा उभारण्यात आला. त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. गुढीपाडव्यादिवशीच या चौकात महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनेक शिवप्रेमी दाखल झालेले. 

प्रशासनाने या पुतळ्याबाबतच्या परवानगीची चौकशी केली. यावेळी कोणतीही परवानगी न घेता हा पुतळा उभारल्याच निदर्शनास आलं. त्यामुळे हा पुतळा हटवण्याबाबत प्रशासनाने पाऊल उचलले. दरम्यान गुढीपाडव्यादिवशी शिवप्रेमीनी याला विरोध केला. त्यानंतर प्रशासनाने पुन्हा रीतसर पद्धतीने आज हा पुतळा हटवण्याबाबत हालचाली सुरु केल्या. गावात या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आले होते.. मात्र आज पुन्हा शिवप्रेमी आक्रमक झाले. त्यामुळे 

(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)

दरम्यान, गावकऱ्यांनी हा पुतळा उभारल्यापासून ठाम भूमिका ठेवली आहे. हा पुतळा हटवला जाणार नाही अशाच प्रतिक्रिया गावाकऱ्यांच्या आहेत. आज यासाठी गावं देखील बंद करण्यात आलेल. शिवप्रेमीच्या आक्रमक भूमिकेनंतर तणावाची परिस्थिती देखील निर्माण झालेली. मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमीच्या विनंतीनंतर हा पुतळा सध्या जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता या पुतळ्याची रीतसर परवानगी घेऊन हा पुतळा खुला करण्यात येणार आहे.