लक्ष्मण सोळुंके, जालना
Jalna Commissioner Santosh Khandekar Arrested by ACB: कंत्राटदाराचे बिल (Contractor's Bill) मंजूर करण्यासाठी जालना महापालिका आयुक्त (Jalna Municipal Commissioner) संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रात्री त्यांच्या शासकीय निवासस्थानीच १० लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जालना शहरात मोठी खळबळ उडाली आहे. Jalna ACB Raid News)
10 लाखांची रक्कम घेताना रंगेहाथ सापडले...
समोर आलेल्या माहितीनुसार, ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. तक्रारदार कंत्राटदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने ताब्यात घेतले. तक्रारदाराने लाचेची रक्कम दिल्यानंतर बाहेर येऊन दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाला हात वर करून इशारा दिला. त्यानंतर अंधारात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने आयुक्तांच्या निवासस्थानात प्रवेश केला आणि त्यांना लाचेच्या रकमेसह पकडले.
Jalna News: महापालिका आयुक्त रंगेहाथ ACB च्या जाळ्यात, लाचेची रक्कम ऐकून घाम फुटेल
'दुनिया सांगे ब्रम्हज्ञान...'
धक्कादायक बाब म्हणजे, आयुक्त संतोष खांडेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना झापले होते. काही कर्मचारी पैसे घेऊन अतिक्रमण नियमित करत असल्याच्या तक्रारी आयुक्तांपर्यंत पोहोचल्या होत्या. या तक्रारींवरून आपल्या केबिनमध्ये बोलावून झापले होते. मात्र त्यानंतर दोनच दिवसांनी स्वत: आयुक्त संतोष खांडेकर हे लाच घेताना सापडले. या प्रकारामुळे दुनिया सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण.. असाच काहीसा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
कोण आहेत संतोष खांडेकर? | Who is Santosh Khandekar?
संतोष खांडेकर हे मूळचे सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील रहिवासी आहेत. MPSC मार्फत क्लास 2 अधिकारी म्हणून ते शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी 6 वर्ष पोलीस उपनिरीक्षक म्हणून यवतमाळ, अमरावतीमध्ये काम पाहिले. 2022 मध्ये त्यांनी जालना नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. 9 मे 2023 रोजी जालना नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाले. त्यानंतर जालना मनपाचे पहिले आयुक्त म्हणून संतोष खांडेकरांची नियुक्ती करण्यात आली.