Jalna Crime: भररस्त्यात गाठलं, पुतण्याने काकासह मुलाला संपवलं; दुहेरी हत्याकांडाने जालना हादरलं

काका आणि चुलत भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना भरदिवसा बदनापूर पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या गल्लीत घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना: जालन्यामधील बदनापूर पोलीस ठाण्याच्या शेजारी तीक्ष्ण हत्याराने वार करून दोघांचा निर्घृणपणे खून केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून पुतण्यानेच पाच- ते सहा जणांसह चुलत्यावर आणि चुलत भावावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या भयंकर घटनेने संपूर्ण जालना जिल्हा हादरुन गेला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आर्थिक देवाण-घेवानीतून बदनापूर पोलिस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर पुतण्यासह पाच ते सहा जणांनी तिक्ष्ण हत्यारासह हल्ला करत काका आणि चुलत भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना भरदिवसा बदनापूर पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या गल्लीत घडली.

पुतण्यासह पाच ते सहा जणांनी केलेल्या या धारदार शस्त्राच्या हल्यात अशोक आंबीढगे व त्यांचा मुलगा यश अशोक आंबीढगे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. बदनापूर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतररावर झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

( नक्की वाचा :  भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story )

यावेळी जखमी अवस्थेत असलेल्या अशोक आंबीढगे व त्यांचा मुलगा यश अशोक आंबीढगे यांना बदनापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र  डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत्यू झाल्याची माहिती दिली. पाच ते सहा जणांनी पोलिस ठाण्याच्या शेजारीच केलेल्या या हल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरल आहे. पोलिसांनी पुतण्यासह त्याच्यासोबत असलेल्या आरोपींचाशोध सुरु केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू