जाहिरात

Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

फिलिपिन्सला पर्यटनासाठी गेलेलं वसईतील दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे.

Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

मनोज सातवी, प्रतिनिधी

फिलिपिन्सला पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. परदेशात फिरण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्याच्या निधनाने त्यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून वसईकरांमध्ये शोकाकुल वातावरण पसरलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मिळालेल्या माहितीनुसार, . वसईतील सांडोर येथील जेराल्ड परेरा (50) आणि त्यांची पत्नी प्रिया परेरा (46) यांचे 10 मे 2025 रोजी फिलीपिन्समधील बाडियान येथे पर्यटनासाठी गेले होते. जेराल्ड आणि प्रिया या दुचाकीवरुन जात असताना एका फिलिपिनो महिलेने बेदरकारपणे चालवलेल्या कार (टोयोटा हिलक्स ट्रक)ने धोकादायक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि नियंत्रण गमावले आणि त्यांना धडक दिली. या धडकेमुळे त्यांची दुचाकी सिमेंटच्या विद्युत खांबाला धडकली. एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेल्या दृश्यांमध्ये परेरा पती पत्नी कार आणि विजेच्या खांबाच्या मधे गंभीर जखमी अवस्थेत अडकल्याचं दिसत आहे. त्यांना तातडीने उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. 

Sand Mafia : संतापजनक, वाळू माफियांवर कारवाईवर गेलेल्या पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडलं

नक्की वाचा - Sand Mafia : संतापजनक, वाळू माफियांवर कारवाईवर गेलेल्या पोलिसाला ट्रॅक्टरने चिरडलं

बाडियान येथील रुग्णालात पोहोचण्याआधीच प्रिया परेरा यांना मृत घोषित करण्यात आलं, तर जेराल्ड परेरा यांच्यावर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्या महिलेने परेरा दाम्पत्याला धडक दिली तिने आणखी दोन दुचाकींना धडक दिली होती. तिला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

परेरा यांच्या मागे मुलगा तनिष (20)आणि मुलगी त्रिशा (17) आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले वृद्ध आईवडील आहेत. जेरोल्ड शीपवर कामाला होते, तर पत्नी मुंबईत शिक्षिका म्हणून काम करीत होती. या दाम्पत्याच्या निधनाने वसईकरांमध्ये शोकाकूल वातावरण पसरलं आहे. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह मुंबईत आणण्यात येणार आहे. यानंतर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com