पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत अनैसर्गिक संबंध? प्रज्वल रेवण्णांचा भाऊ सूरज यांना अटक

कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणात आरोपी जेडीएस नेता एचडी रेवण्णा आणि त्यांचा मोठा मुलगा प्रज्वल रेवण्णानंतर त्यांचा लहान भाऊ सूरजचं नाव पुढे आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कर्नाटक:

कर्नाटकच्या चर्चित सेक्स स्कँडलने (sex scandals of Karnataka) नवं वळण घेतलं आहे. या प्रकरणात आरोपी जेडीएस नेता एचडी रेवण्णा आणि त्यांचा मोठा मुलगा प्रज्वल रेवण्णानंतर त्यांचा लहान भाऊ सूरजचं नाव पुढे आलं आहे. हसन जिल्ह्याच्या होलनरसिपुरा पोलीस ठाण्यात सूरजविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराने त्यांच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा (Prajwal Revanna's Brother Suraj) आरोप केला आहे. पोलिसांनी सूरजविरोधात आयपीसी 377, 342, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदाराने (27 वर्षे) तो जेडीएसचा कार्यकर्त्या असल्याचा दावा केला आहे. गेली अनेक वर्षे पक्षासाठी काम करीत होता. त्याने आपल्या तक्रारीत दिल्यानुसार, सूरज रेवण्णा यांनी त्याला 16 जून रोजी त्यांच्या फार्म हाऊसवर बोलावलं होतं. तेथे सूरज माझ्याशी व्यवस्थित बोलल्याचं त्याने सांगितलं. मात्र काही वेळाने सूरज यांनी त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि माझ्या कानाला स्पर्श करू लागले. मी घाबरलो. ते म्हणाले, चिंता करू नको, मी तुला साथ देईल. त्यानंतर त्यांनी माझं चुंबन घेतलं. (Allegedly Sexually Assaulting Man) मी त्यांना ढकललं आणि आरडाओरडा करू लागलो. यानंतर सूरज माझ्यावर चिडल्याचं तक्रारदाराने सांगितलं. तू मला साथ दिली नाही, तर तुझा जीव घेईन अशी धमकी दिली. यानंतर सूरज मला खोलीत घेऊन गेले, ते माझ्याशी अश्लील भाषेत बोलत होते. यानंतर ते माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करू लागले आणि माझ्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवले. 

Advertisement
Advertisement

यापूर्वी सूरज रेवण्णाने दोन जणांविरोधात ब्लॅकमेलच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केली होती. यानुसार, काहीजणं सूरज यांना लैंगिक अत्याचाराच्या खोट्या आरोपाखाली फसवत आहेत. एफआयआरनुसार, सूरज रेवण्णा आणि शिवकुमार यांनी चेतन आणि त्याच्या एका नातेवाईकाविरोधात तक्रार दाखल केली होती. या एफआयआरनुसार, काहीजणं सूरजला ब्लॅकमेल करीत होते. पाच कोटी द्या अन्यथा तुमच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप करू असं म्हणत सूरज यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. 

Advertisement