अमजेद खान, कल्याण: कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी विशाल गवळीसह त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली असून दहा वर्षापासून विशाल गवळीकडून अल्पवयीन मुली मुलांवर लैंगिक अत्याचार सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे.
लैगिंक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा दहा वर्षापासून लैगिंक छळ करीत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१४ ते २०२४ या कालावधीत केलेल्या गुन्हयाची माहिती समोर आली आहे.प्र त्येक गुन्ह्यात त्याने मिळविलेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांना प्रक्रिया सुरु केली आहे. किती आरोपींना मानसिक रुग्णाचा दाखला देण्यात आला आहे. यासाठी केडीएमसी, ठाणे सिव्हील, मेंटल रुग्णालय आणि मुंबईतील रुग्णालयांना पत्र देऊन पोलिस माहिती घेणार आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याणमधील नराधमाची सगळी कुंडली:
1. 2015 साली प्राणघातक हल्ला
2. 2016 साली एका अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार
3. 2019 साली विशाल गवळीला तडीपार केले हाेते. मात्र त्याने आदेशाचा भंग केला. या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
4. 2020 मध्ये पुन्हा तडीपारीचा आदेश भंग केला.
5. 2021 मध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार
6: 2022 मध्ये लुटीची घटना
7: 2023 मध्ये अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
8: त्यानंतर आत्ता 2014 साली अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्यााचर करुन तिची हत्या केली.
दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी काल सायंकाळी पिडीत कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांच्या मनात भिती आहे. मात्र आम्ही त्यांना सांगितले की, चिंता करुन नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्याला योग्य धडा शिकविला जाईल.
तसेच पोलिसांचा तपास योग्य आहे. त्याने मनोरुग्णाचा दाखला घेतला आहे. तो वस्तूस्थितीला धरुन नाही. तर चुकीच्या पद्धतीने घेतला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. हा दाखला देणारे कोण आहेत याचा शोध घेतला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिले.