गॅरेज चालवण्याच्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान भावाला वाचवायला गेलेल्या तरुणाला टोळक्याने जबर जखमी केले आहे. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. जखमी तरुण अनिकेत व्यास याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घटना अनिकेत राहत असलेल्या म्हारळ गावात घडल्याने कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिकेत याचे डोंबिवलीतील गणेश नगर येथे गॅरेज आहे. हे गॅरेज येथे चालू नये यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र अनिकेत काही ऐकत नव्हता. त्यामुळे सोमवारी रात्री दहा ते बारा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. कल्याण नजीक म्हारळ गावातील संदीप कॉम्प्लेक्समध्ये अनिकेत राहातो. त्याच्या घरी जावून त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी अनिकेतला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ आशुतोष व्यास हा मध्यस्थी पडला. यावेळी टोळक्यातील काही व्यक्तींनी त्याल रॉडने तसेच हत्याराने जबर जखमी केले. तर अनिकेत किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर आशुतोषला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात जखमी अवस्थेत आणण्यात आले, असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी मांडा टिटवाळा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.