तामिळनाडूतून चोरी करायला यायचे मुंबईत; पोलिसांनी प्लानिंग करुन आरोपींना ठोकल्या बेड्या

अटक करण्यात आलेले चौघे आरोपी तामिळनाडूचे आहेत .आरोपींकडून पोलिसांनी 11 महागडे मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

मध्य रेल्वेतील प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रान्च पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेले चौघे आरोपी तामिळनाडूचे आहेत .आरोपींकडून पोलिसांनी 11 महागडे मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाच्या मोबाईल चोरी प्रकरणात सत्यराज ओंथुरगा या चोरट्याला ताब्यात घेतलं होतं .एकीकडे डोंबिवली जीआरपी पोलीस सत्यराजकडून माहिती घेत होते. तर दुसरीकडे कल्याण रेल्वे क्राईम ब्रान्च पोलीस देखील सत्यराज याने दिलेल्या माहितीनुसार तपास करत होते.

(नक्की वाचा - कोपर्डीमध्ये दलित तरुणाला विवस्त्र करून मारहाण, शेवटी उचललं टोकाचं पाऊल)

मध्य रेल्वेचे डीसीपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रान्चने पोलीस निरीक्षक अरशद शेख, पोलीस अधिकारी प्रकाश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की सत्यराजचे साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार आहेत. 

रेल्वे क्राईम ब्रान्च पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर सापळा रचला. चोरी करण्यास आलेले कृष्णा गणेश , शक्तीवेल अवालुडन, गणेश सेल्वम या सर्वांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी प्रवाशांचे लुटलेले 11 महागडे मोबाईल व एक लॅपटॉप हस्तगत केला. धक्कादायक म्हणजे चोरट्यांची ही टोळी तामिळनाडू राज्यातील वेल्लूर जिल्हा येथील उदयराजा पालयन या गावातून फक्त चोरी करायला मुंबईत आले होते. 

Advertisement

(नक्की वाचा- किराणा दुकानात सुरू होती भलत्याचा मालाची विक्री, धाडीनंतर पोलीसही चक्रावले)

ही टोळी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यात देखील रेल्वे स्थानकातील प्रवाशांना लक्ष करते. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. प्रवाशांचे चोरीला गेलेले अनेक महागडे मोबाईल लॅपटॉप हस्तगत केले जाऊ शकतात.

Topics mentioned in this article