Kamal Kaur Bhabhi Murder : घाण घाण व्हिडीओ बनवणारी कमल भाभी गाडीत सापडली, नेमकं काय झालं ?

9 जून रोजी कंचन आपल्या घरी निघाली होती. तिने आईला सांगितले होते की तिला एक कार्यक्रम मिळाला आहे. कंचनला मेहरोंच्या माणसांनी कार्यक्रमाची सुपारी देत असल्याची बतावणी करत आपल्यासोबत नेले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
कमल भाभीला अश्लील व्हिडीओंसाठी यापूर्वीही धमकावण्यात आले होते
नवी दिल्ली:

पंजाबमधील लुधियाना येथील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कंचन उर्फ कमल कौर भाभी (Kamal Kaur Bhabhi) हिची  हत्या करण्यात आली होती. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कमल कौर भाभीच्या हत्येचा कट निहंग अमृतपाल मेहरों (Nihang Amritpal Mehron) याने रचला होता अशी माहिती पुढे येत आहे. मेहरों याने आपल्या दोन साथीदारांसह हा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी अद्याप मेहरोंविरोघा कारवाई केलेली नाही.  

नक्की वाचा : इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

मेहरोंने स्वीकारली जबाबदारी

अमृतपाल सिंह मेहरों याने कमल कौर उर्फ कंचन कुमारी हिच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असून, सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने कमल भाभीची हत्या आपणच केल्याचे म्हटले आहे. मेहरों याने म्हटलंय की खालसा कधीही महिलांवर हात उचलत नाही मात्र कमल भाभीने धर्माचा अपमान केला, तख्ताची बदनामी होईल असे कृत्य केले ज्यामुळे तिला ठार मारण्यात आले. शिखांचा इतिहास आणि संस्कृतीला बट्टा लावण्यासाठी कमल भाभीने 'कौर' शब्दाचा वापर केला, ज्यामुळे तिला शिक्षा देण्यात आल्याचे अमृतपालने म्हटले आहे. मेहरों याने यापूर्वीही कमल भाभीला घाण, घाण व्हिडीओ चित्रीत करून सोशल मीडियावर टाकल्याबद्दल धमकावले होते.  

Advertisement

नक्की वाचा : आणखी एका महिलेचा हात, राजाच्या मृत्यूची भविष्यवाणी करणारे गुरुजी असं का म्हणाले?

कमल भाभीचे इन्स्टाग्रामवर 4 लाख फॉलोअर्स

कंचन उर्फ कमल कौर भाभी (30 वर्षे)ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती आणि तिचे Instagram वर 4 लाखांच्या आसपास फॉलोअर्स आहेत. कंचनचा मृतदेह बुधवारी रात्री बठिंडा येथे तिच्याच कारमध्ये सापडला होता.  बठिंडा येथील आदेश मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या कार पार्किंगमध्ये तिची कार उभी करण्यात आली होती.  10 जून रोजी सकाळच्या सुमारास एक शीख तरुण पार्किंगमध्ये तिची कार  पार्क करताना आणि नंतर पळून जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसला होता. 11 जूनच्या रात्री आठ वाजेपर्यंत कोणाला या खुनाची कल्पना आली नव्हती. कारमधून दुर्गंधी यायला लागल्यानंतर  पार्किंगमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावले ज्यानंतर या खुनाबद्दल कळाले होते.

Advertisement

कार्यक्रमाच्या नावाखाली बोलावले

9 जून रोजी कंचन आपल्या घरी निघाली होती. तिने आईला सांगितले होते की तिला एक कार्यक्रम मिळाला आहे. कंचनला मेहरोंच्या माणसांनी कार्यक्रमाची सुपारी देत असल्याची बतावणी करत आपल्यासोबत नेले होते. यानंतर त्यांनी कंचनचा खून केला आणि तिला गाडीच्या मागच्या सीटवर फेकून दिले. कंचन ही कमल कौर भाभी नावाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पब्लिश करत होती. तिचा मजकूर अश्लील असल्याने अनेकांनी तिला धमक्या दिल्या होत्या. दहशतवादी अर्श डल्ला यानेही तिला धमकावले होते. 
 

Advertisement
Topics mentioned in this article