धक्कादायक! बड्या आयपीएस अधिकाऱ्याचा ऑफिसमधील अश्लील VIDEO VIRAL; राजकारणात मोठी खळबळ

DGP Ramachandra Rao Video: एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा त्याच्याच कार्यालयातील एक खाजगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने सध्या संपूर्ण देशाच्या पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
DGP Ramachandra Rao : हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई:

DGP Ramachandra Rao Video: एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा त्याच्याच कार्यालयातील एक खाजगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने सध्या संपूर्ण देशाच्या पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. वर्दीची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, यामुळे प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. 

विशेष म्हणजे हा अधिकारी साध्या पदावर नसून थेट डीजीपी दर्जाचा आहे. या धक्कादायक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

पोलीस दलाचा सन्मान राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तोच अधिकारी आपल्या केबिनमध्ये एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहायला मिळत आहे. 

या व्हिडिओमध्ये संबंधित अधिकारी गणवेशात असतानाच महिलेला मिठी मारताना आणि तिचे चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणाची पाळेमुळे थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आहेत.

( नक्की वाचा : ना नदी, ना समुद्र, चक्क इमारतीच्या बेसमेंटमध्ये बुडून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू! वाचा नेमकं काय घडलं? )
 

काय आहे प्रकरण?

प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी ही घटना दक्षिण भारतातील कर्नाटक राज्याची आहे. कर्नाटक पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. रामचंद्र राव यांचा हा व्हिडिओ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रामचंद्र राव हे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयात (डीसीआरई) पोलीस महानिर्देशक म्हणजेच डीजीपी या उच्च पदावर कार्यरत आहेत.

Advertisement

मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश 

हे संपूर्ण प्रकरण उघडकीस येताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तत्काळ गृह मंत्रालयाकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. 

दरम्यान, या वादावर पडदा टाकण्यासाठी डीजीपी रामचंद्र राव यांनी राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गृहमंत्र्यांनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे राव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Advertisement

( नक्की वाचा : हातामध्ये सिगारेट, 120 पेक्षा जास्त स्पीडनं कार, 4 मित्राचा मृत्यू, पाहा 70 सेकंदांचा भयंकर VIDEO )
 

फसविण्याचा कट की सत्य?

एकीकडे हा व्हिडिओ स्पष्ट दिसत असताना दुसरीकडे डीजीपी रामचंद्र राव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि 'मॉर्फ्ड' असून मला मुद्दाम बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी आपण कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, हे व्हिडिओ फुटेज 1 वर्षापूर्वीचे असून ते आता जाणीवपूर्वक बाहेर काढले गेले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

माजी गृहमंत्र्यांचा हल्लाबोल

या लाजिरवाण्या प्रकारावर कर्नाटकचे माजी गृहमंत्री आरागा ज्ञानेंद्र यांनी अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे. "एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे हे वर्तन पाहून माझ्याकडे शब्द उरलेले नाहीत. पोलीस विभाग हा समाजाचा आदर्श असतो आणि अशा अधिकाऱ्यांनीच जर हे कृत्य केले असेल, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाऊ नये," अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुलीच्या गोल्ड स्मगलिंग प्रकरणामुळे चर्चेत

रामचंद्र राव हे नाव वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांची मुलगी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या राव हिला विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले होते. 

मार्च 2025 मध्ये या प्रकरणामुळे रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले होते. रान्याने आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर करून तस्करीचे नेटवर्क तयार केल्याचा आरोप तपासात करण्यात आला होता. आता या नवीन व्हिडिओ प्रकरणामुळे राव यांचे पोलीस दलातील करियर धोक्यात आले आहे.


नोटः  NDTV व्हायरल व्हिडिओची पृष्टी करत नाही.

Topics mentioned in this article