जाहिरात

हातामध्ये सिगारेट, 120 पेक्षा जास्त स्पीडनं कार, 4 मित्राचा मृत्यू, पाहा 70 सेकंदांचा भयंकर VIDEO

Horrific Car Accident Viral Video: . एका तरुणाचा वाढदिवस साजरा करून आनंदाने घरी परतणाऱ्या सहा मित्रांवर काळाने झडप घातली. या भीषण अपघाताचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे.

हातामध्ये सिगारेट, 120 पेक्षा जास्त स्पीडनं कार, 4 मित्राचा मृत्यू, पाहा 70 सेकंदांचा भयंकर VIDEO
Car Accident Viral Videon : या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई:

Udaipur Horrific Car Accident Viral Video: एका हातात सिगारेट, दुसऱ्या हाताने स्टेअरिंगवर नियंत्रण आणि डोळ्यांत वेगाची नशा... आनंदाच्या क्षणांचे रूपांतर स्मशानशांततेत व्हायला अवघ्या काही सेकंदांचा कालावधी लागला. एका तरुणाचा वाढदिवस साजरा करून आनंदाने घरी परतणाऱ्या सहा मित्रांवर काळाने झडप घातली. या भीषण अपघाताचा एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे

मृत्यूचा 1 मिनिट 10 सेकंदांचा थरार

राजस्थानमधील उदयपूरमधली ही धक्कादायक घटना आहे. या अपघाताचा एक व्हिडिओ आता समोर आलाय.  1 मिनिट 10 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये कारमधील परिस्थिती स्पष्ट दिसत आहे. 

कार चालवणारा तरुण एका हाताने सिगारेट पीत आहे आणि कारचा वेग काट्याप्रमाणे वाढत जातोय. कारमधील मीटरवर नजर टाकली तर वेग 100, 120 आणि थेट 140 किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचल्याचे दिसते. 

( नक्की वाचा : Tragic Death : बापाचा शेवटचा संघर्ष! रक्ताच्या थारोळ्यातून मुलीला केला कॉल, दुर्दैवी अंत वाचून डोळे पाणावतील )

मागच्या सीटवर बसलेला एक मित्र हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट करत होता, तर दुसरा एक मित्र वारंवार विनवणी करत होता की, इतक्या वेगाने गाडी चालवू नको. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.

मला वाचवा... श्वास घेता येत नाहीये

अपघात झाल्यानंतरचा जो भाग व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आहे, तो ऐकून कोणाचेही हृदय पिळवटून निघेल. कारचा चक्काचूर झाल्यानंतर आत अडकलेल्या एका तरुणाचा आर्त आवाज ऐकू येतोय. 

तो ओरडून सांगतोय की, भाई मी आत अडकलो आहे, कोणीतरी मला बाहेर काढा, मला श्वास घ्यायला त्रास होतोय. मदतीसाठी केलेली ही विनवणी आणि त्यानंतर पसरलेली शांतता या अपघाताची भीषणता सांगण्यासाठी पुरेशी आहे.

(नक्की वाचा : अल्पवयीन मुलीला Grooming Gang चा विळखा, घरात कोंडलं, पण 200 जणांनी एकत्र येत केली थरारक सुटका, पाहा VIDEO )

वाढदिवसाचा आनंद ठरला शेवटचा

उदयपूरच्या  बरकत कॉलनीतील रहिवासी असलेल्या अयानचा 16 जानेवारी रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसाचे निमित्त साधून तो त्याच्या 6 मित्रांसह एका सामाजिक कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रम आटोपून हे सर्व मित्र कारने बाहेर चहा पिण्यासाठी निघाले होते. चहा पिऊन परत येत असतानाच हा भीषण अपघात झाला. ज्या मित्राचा वाढदिवस साजरा झाला, त्याच दिवशी त्याच्यावर आणि त्याच्या मित्रांवर अशी वेळ येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

सवीना परिसरातून हे सर्व मित्र हायवेच्या दिशेने येत असताना गुजरातकडून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या गाडीला भीषण टक्कर दिली. सवीना पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जबरदस्त होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यामध्ये उदयपूरमधील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जखमींची अवस्था गंभीर

या अपघातामध्ये फक्त अयान आणि त्याचे मित्रच नाही, तर दुसऱ्या कारमधील लोकही जखमी झाले आहेत. दुसऱ्या कारमधील प्रवासी हे गुजरातचे रहिवासी आहेत. या भीषण अपघातात एकूण 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एमबी हॉस्पिटल आणि एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि वाहन चालवताना केलेली बेजबाबदार कृती कशा प्रकारे जीवावर बेतू शकते, हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com