- कर्नाटकातील इनापूर गावात प्रेमविवाह केल्यामुळे गर्भवती मुलीवर बापाने तलवारीने हल्ला करून तिची हत्या केली
- मान्या पाटील आणि विवेकानंद दोड्डामणी यांचा आंतरजातीय विवाह कुटुंबीयांचा विरोध असताना सात महिन्यांपूर्वी झाला
- आरोपी प्रकाशगौडा पाटील आणि त्याच्या नातेवाईकांनी सासरच्या घरात घुसून मान्याला व सासूला हल्ला केला
ज्या बापाच्या अंगाखांद्यावर ती खेळली, त्याच बापाने पोटच्या गोळ्याचा घात केला. त्या निर्दयी बापाने तिच्या पाटात वाढत असलेल्या चिमुकल्याचाही विचार केला नाही. गर्भवती असलेल्या मुलीवरच तिच्या सासरी जावून घरात घुसून तलवारीने सपासप वार करत ठार केले. प्रेमविवाह केला म्हणून या निर्दयी पित्याने आपल्या गर्भवती लेकीची हत्या केली. कर्नाटकातील इनापूर गावात घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. सैराटला ही लाजवेल असं हे कृत्य होतं. या घटनेनंतर एकच हळहळ आणि संतापही व्यक्त केला जात आहे. या हत्ये मागे प्रेमविवाहा बरोबरच जातीय गणित ही आहे. त्यातूनच ही मुलीची बापाने हत्या केली.
मान्या पाटील या तरुणीचे गावातीलच विवेकानंद या तरुणाशी प्रेम संबंध होतंय. त्यांनी त्यातून लग्न केले होते. मात्र, हे लग्न मान्याच्या घरच्यांना मान्य नव्हते. रविवारी संधी साधून वडील प्रकाशगौडा पाटील यांनी नातेवाईकांसह तिच्या सासरच्या घरात घुसले. "तू आमच्या घराण्याची अब्रू घालवलीस," असे म्हणत त्यांनी मान्यावर तलवारीने हल्ला चढवला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मान्याचा जागीच मृत्यू झाला. वाचवायला आलेल्या सासूलाही आरोपींनी सोडले नाही. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या घटनेने 'ऑनर किलिंग'चा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कर्नाटकातील हुबळी तालुक्यातील इनापूर गावात जातीअंताच्या विखारातून ही भीषण घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आपल्या 6 महिन्यांच्या गर्भवती मुलीलाच संपवले. या हल्ल्यात मुलीची सासू देखील गंभीर जखमी झाली आहे. मान्या पाटील आणि विवेकानंद दोड्डामणी यांच्या आंतरजातीय विवाहाला असलेल्या विरोधातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मान्या आणि विवेकानंद यांनी 7 महिन्यांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन विवाह केला होता.
विवेकानंद हा दलित समाजातील असल्याने मान्याच्या कुटुंबाचा या लग्नाला तीव्र विरोध होता. हा विरोध झुगारून या दोघांनी लग्न केले. शिवाय ते गाव सोडून अन्य ठिकाणी राहात होते. पण त्यांनी सात महिन्यानंतर गावात परतण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या जिवावरच बेतेल याची त्यांना पुसटतीही कल्पना नव्हती. 8 डिसेंबर रोजी हे दांपत्य गावात परतले. ते गावात येण्याची वाट मुलीचे कुटुंबीय पाहातच होते. त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती. रविवारी संध्याकाळी आरोपींनी विवेकानंदांना घराबाहेर काढण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या अपघाताचा बनाव रचला. त्यानंतर घरात घुसून मान्यावर हल्ला केला. त्यात तिला ठार करण्यात आले. पोलिस कारवाई या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी प्रकाशगौडा पाटील याला अटक केली असून, त्याचे इतर साथीदार फरार आहेत. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.