Chhatrapati Sambhajinagar News: गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे 17 वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी फक्त चार तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. वैष्णवी संतोष नीळ असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी (19 डिसेंबर) दुपारच्या सुमारास हत्येची घटना उघडकीस आली. वैष्णवी नीळ हत्या प्रकरणात एकही साक्षीदार तसेच ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बाब ठरत होती. पण अवघ्या चार तासांत आरोपीला वाळूज पोलिसांनी अटक केली.
वैष्णवी नीळची हत्या कोणी केली? | Chhatrapati Sambhajinagar News Vaishnavi Neel Murder Case
वैष्णवीची हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव नानासाहेब मोरे (वय 27 वर्षे) असे आहे. घरात कोणीच नसल्याची संधी साधत परिसरात राहणारा आरोपी वैष्णवीच्या घरी पोहोचला आणि धारदार शस्त्राने वैष्णवीची हत्या करून तो पसार झाला. तक्रार दाखल झाल्यानंतर शनिवारी (20 डिसेंबर) पहाटे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. एकाच ठिकाणी राहणाऱ्या वैष्णवी आणि नानासाहेबमध्ये मैत्रीपूर्णसंबंध होते, पण काही कारणास्तव त्यांच्यातील वाद वाढत गेले आणि याच वादातून आरोपीने वैष्णवीची निर्घृण हत्या केली.
(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरले! पीजीत राहणाऱ्या मद्यधुंद तरुणीवर मालकाची घाणेरडी नजर, पुढे घडला अतिशय संतापजनक प्रकार)
आरोपीचा शोध कसा लागला?
शेजारी राहणारा नानासाहेब घरी नसल्याच्या माहितीने पोलिसांचे लक्ष वेधले. याच शंकेतून पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गंगापूरमधील बोलेगाव येथे लपून बसलेल्या नानासाहेबला पोलिसांनी पहाटेच्या सुमारास अटक केली. तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलीय.
(नक्की वाचा: Nagpur News: पुण्यानंतर नागपूरकरांमध्ये भीती! चाकूहल्ल्यात 13 वर्षांचा शाळकरी विद्यार्थी गंभीर, आरोपी अल्पवयीन?)
वैष्णवीच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ती कॉलेजमधून घरी परतली. वैष्णवीचे वडील संतोष नीळ पानटपरी चालवण्यासाठी घराबाहेर पडले तर आई सुद्धा शेतकामासाठी गेली होती. वैष्णवीचा भाऊ शाळेमध्ये होता. कॉलेजमधून आलेली वैष्णवी घरात एकटीच होती. आरोपीने याच गोष्टीचा फायदा घेतला. आईवडील घरी परतल्यानंतर त्यांना वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. कुटुंबीयांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेतली पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

