लग्नानंतर इस्लाम धर्माचा स्वीकार कर अन्यथा बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी पत्नीनं केल्याचा आरोप पीडित पतीनं केला आहे. कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यातले हे प्रकरण आहे. विशाल कुमार गोकावी असं या पीडित व्यक्तीचं नाव आहे. विशालचे तहसीन होसमणीसोबत तीन वर्षांपासून संबंध होते. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र, लग्नानंतर होसमणीने मुस्लिम रितीरिवाजानुसार पुन्हा लग्न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप विशाल यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
विशाल यांनी सांगितलं की, संबंधांमध्ये शांतता राखण्यासाठी त्याने होसमणीचे म्हणणे मान्य केले आणि 25 एप्रिल रोजी मुस्लिम रितीरिवाजानुसार लग्न केले. पण, या समारंभात माहिती नसताना त्याचे नाव बदलण्यात आले आणि मौलवीने त्याच्या नकळत त्याचे धर्मांतर केले.
( नक्की वाचा : 'सर्व हिंदूंचा हिशेब केला जाईल', योगी सरकार गेल्यावर.... सक्तीनं धर्मांतर करणाऱ्या छांगूरच्या गुंडांची धमकी )
या समारंभानंतर त्यांच्या कुटुंबाने 5 जून रोजी हिंदू रितीरिवाजानुसार लग्नाची तयारी सुरू केली होती. त्यांनी आरोप केला की, होसमणीने सुरुवातीला होकार दिला होता, परंतु नंतर तिच्या कुटुंबाच्या दबावाखाली तिने माघार घेतली.
विशालने दावा केला की, होसमणीने त्यांना धमकी दिली होती की, त्याने इस्लाम धर्म स्वीकारला नाही, तर ती त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. होसमणी आणि तिची आई, बेगम बानो यांनी त्यांना नमाज पढायला आणि जमातमध्ये (धार्मिक मंडळी) सहभागी होण्यास भाग पाडले, असा आरोपही त्याने केला.
( नक्की वाचा : Crime News: धक्कादायक! घरात मुलीचा मृतदेह, हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पार्टी करत होती निर्दयी आई )
पोलिसांनी बुधवारी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 299 (कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृती) आणि कलम 302 (व्यक्तींच्या धार्मिक भावनांना हानी पोहोचवण्याचा उद्देश असलेल्या कृतींपासून संरक्षण) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.