Murdered Women Comes Back Alive : कधी-कधी प्रत्यक्ष आयुष्यातील घटना देखील एखाद्या चित्रपटाच्या रहस्यमय पटकथेला लाजवणाऱ्या असतात. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीवर अंत्यसंस्कार केले. काही वर्षांनी पोलिसांनी त्यानं पत्नीची हत्या केली असता आरोप ठेवून त्याला अटक केली. त्या आरोपात त्यानं तुरुंगवास भोगला. तो त्यानंतर गावी परतला आणि त्याला धक्काच बसला. त्याची बायको जिवंत होती. इतकंच नाही तर तिच्या बॉयफ्रेंडसोत हातामध्ये हात घालून बिनधास्त फिरत होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कर्नाटकतल्या कोडेगु जिल्ह्यातील बसनवहळ्ळी गावातील हा प्रकार आहे. या गावातील सुरेश त्याची पत्नी मल्लिगेबरोबर शांतपणे आयुष्य जगत होता. 2019 साली अचानक त्याची पत्नी नाहिशी झाली. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते, अशी कुणकुण सुरेशला लागली होती. त्यानंतरही त्यानं मल्लिगेला मुलांच्या भवितव्यासाठी परत यावं अशी विनंती केली. पण, तिने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
आपल्याला चुकीच्या प्रकरणात अडकवलं जाईल या भीतीनं सुरेशनं 2021 साली खुशालनगर पोलीस स्टेशनमध्ये पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पण, त्यानंतर 2022 साली या प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलं.
( नक्की वाचा : Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं! )
पत्नीच्या हत्येखाली अटक
2022 साली सुरेशला पोलिसांनी बोलावलं. त्याची पत्नी मल्लिगेच्या अस्थी सापडल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर सुरेशनं त्याच्या सासूसोबत पत्नीवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी पत्नीच्या हत्येखाली त्याला अटक केली. सुरेशनं सर्व आरोप फेटालले. पण, त्याचा उपयोग झाला नाही. पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली.
फॉरेन्सिक डीएनच चाचणीच्या अहवालात त्या अस्थीचे डिएनए मल्लिगेच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी जुळले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी त्याची तुरुंगातून सुटका केली.
1 एप्रिल 2025 रोजी या प्रकरणाला नवं वळण मिळालं. सुरेशच्या काही मित्रांनी मडेकीरीमधील हॉटेलात मल्लिगा तिच्या प्रियकरासोबत बिनधास्त फिरत असल्याचं पाहिलं. हा प्रकार पाहून धक्का बसलेल्या मित्रांनी तिचे फोटो काढले आणि त्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी तात्काळ मल्लिगेला अटक केली असून तिची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.