Pahalgam Terrorist Attack Live : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 28 जणांचा हकनाक बळी गेला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. फिरण्यासाठी काश्मीरमध्ये गेलेल्या निष्पाप पर्यटकांचा त्यांच्या नातेवाईकांसमोर जीव घेण्यात आला. बायकोसमोर पतीवर गोळ्या घालण्यात आला. या घटनेचे फोटो, व्हिडिओ संताप वाढवणारे आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी या तिन्ही पर्यटकांच्या पार्थिवावर डोंबिवलीतील शिव मंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. दरम्यान आज डोंबिवलीवर शोककळा पसरली आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवलीकरांनी बंदची हाक दिली आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी डोंबिवली बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. भाजपा माजी नगरसेवक राहुल दामले यांनी याबाबत माहिती दिली.
नक्की वाचा - Pahalgam Attack: हाताची मेंदी जाण्या आधीचं कुंकू पुसलं, हनिमूनला गेलेल्या जोडप्याबरोबर भयंकर घडलं
डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला. डोंबिवलीचे कौस्तुभ लेले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला. कौस्तुभ लेले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या हल्ल्यात त्यांचा भाऊ संजय लेले आणि बालमित्र हेमंत जोशी यांचा हकनाक बळी गेला. माझ्या पुतण्यासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. व्यक्त करावा तेवढा संताप कमी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
भारताचा मोठा निर्णय
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पाकिस्तानसोबत केलेला सिंधु पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसादेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पीएम आवासमध्ये सीएसएसची बैठक पार पडली.