Kashmir Terror Attack : दहशतवाद्यांचा आणखी एक कट, आदिल हुसैनच्या घरावर कारवाईदरम्यान मोठा धोका टळला

काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणखी एक मोठा धोका टळला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Kashmir Pahalgam Terror Attack : काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणखी एक मोठा धोका टळला आहे. पहलगाम हल्ल्याशी संबंधित एका दहशतवाद्याचं घर उद्ध्वस्त झालं आहे. आदिल हुसैन ठोकर असं त्याचं नाव आहे. सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात होती. यादरम्यान सुरक्षा रक्षक दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याच्या घरी कारवाईसाठी गेले होते, असं म्हटलं जात आहे. यावेळी त्याच्या घरात सुरक्षा दलाला काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. त्यानंतर ते घराच्या बाहेर पडले आणि घरात मोठा स्फोट झाला. यामध्ये आदिल हुसेन ठोकर याचं घर उद्ध्वस्त झालं आहे. वेळीच घराबाहेर पडल्याने सुरक्षा दलाचे जवान थोडक्यात बचावले आहेत, अशी माहिती आहे.  दुसरीकडे आसिफ शेख या दहशतवाद्याचं घरही बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती आहे. अद्याप या कारवाईबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. 

बातमी अपडेट होत आहे.