Kerala Murder Case: ...म्हणून मी प्रेयसीलाही ठार केलं, 5 जणांची हत्या करणाऱ्या आरोपीचा खुलासा; 'ती एकटी...'

हत्येनंतर आरोपी अफानने स्वतः वेंजारामूडू पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

केरळ:  केरळमधील वेंजरामूडू येथे एका 23 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीसह काका, काकी, भाऊ, आजीची निर्घृणपणे हत्या केल्या होती. या पाच जणांच्या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशातच आता आरोपी अफानने ती माझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी प्रेयसीचीही हत्या केली, असा संतापजनक खुलासा केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 मी प्रेयसीची हत्या केली कारण ती माझ्याशिवाय एकटी राहू शकणार नव्हती, असा धक्कादायक खुलासा केरळमधील वेंजरामूडू सामूहिक हत्याकांडातील आरोपी २३ वर्षीय अफानने केला आहे.  हत्येनंतर आरोपी अफानने स्वतः वेंजारामूडू पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती आता स्थिर आहे आणि चौकशीनंतर त्याला औपचारिकरित्या अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (28 फेब्रुवारी) पोलिसांनी सांगितले की, या जघन्य गुन्ह्यामागे आर्थिक अडचणी हे एक मोठे कारण असू शकते. तपासात असे आढळून आले की आरोपीने 14 वेगवेगळ्या कर्जदारांकडून सुमारे 65 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला त्याने त्याच्या आई आणि भावासोबत आत्महत्या करण्याचा विचार केला होता, परंतु 24 फेब्रुवारी रोजी त्याने त्याच्या 88 वर्षीय आजी, 13 वर्षीय भाऊ, प्रेयसी, काका आणि काकू यांची हत्या केली.

नक्की वाचा - Shocking Video : थोपाडीत मारलं, पायाला चावली...केस ओढले; प्रॉपर्टीसाठी लेकीकडून आईचा अनन्वित छळ

आरोपीच्या वडिलांनी मात्र गुन्ह्यामागील आर्थिक संकट हे कारण असल्याचे नाकारले.  "आमच्या कुटुंबावर कोणतेही मोठे कर्ज नव्हते. हत्येमागील खरे कारण माहित नाही आणि पोलिसांनी त्याचा तपास करावा, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, हत्येनंतर अफानने त्याच्या आईवरही हल्ला केला, परंतु ती वाचली आणि सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि येत्या काही दिवसांत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

Pune Crime : आई घराबाहेर जाताच नराधम बाप लेकीच्या जवळ...; नांदेड सिटीतील घटनेने पुणे पुन्हा हादरलं!

Topics mentioned in this article