जाहिरात

Shocking Video : थोबाडीत मारलं, पायाला चावली...केस ओढले; प्रॉपर्टीसाठी लेकीकडून आईचा अनन्वित छळ

लेक आईचं दु:ख समजून घेऊ शकते असं म्हणतात. मात्र याच नात्याला काळीमा लावणारा प्रकार समोर आला आहे.

Shocking Video : थोबाडीत मारलं, पायाला चावली...केस ओढले; प्रॉपर्टीसाठी लेकीकडून आईचा अनन्वित छळ

Mother beaten by daughter : आई आणि लेकीचं नातं जगावेगळं असतं. लेक आईचं दु:ख समजून घेऊ शकते असं म्हणतात. मात्र याच नात्याला काळीमा लावणारा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक संतापजनक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये एक वृद्ध महिलेसोबत मारहाण होत असल्याचं दिसत आहे. आणि त्या महिलेची लेकच तिला अत्यंत निघृणपणे मारहाण करीत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी महिलेच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आपल्या बहिणीनेच आपल्या आईला ओलीस ठेवून संपत्तीसाठी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. लेकीकडून संपत्तीसाठी आईला मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात असल्याचं या व्हिडिओमधून दिसून येत आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

Shakti Law : स्वारगेट प्रकरणानंतर शक्ती कायदा पुन्हा चर्चेत; काय आहे हा कायदा, महाराष्ट्रात लागू होण्यात अडचणी कोणत्या? 

नक्की वाचा - Shakti Law : स्वारगेट प्रकरणानंतर शक्ती कायदा पुन्हा चर्चेत; काय आहे हा कायदा, महाराष्ट्रात लागू होण्यात अडचणी कोणत्या? 

संतापजनक व्हिडिओ...
साधारणपणे तीन मिनिटांचा हा व्हिडिओ हिसारच्या आझाद नगरच्या मॉडर्न साकेत कॉलनीचा आहे. आरोपी महिलेचं नाव रिता आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी महिला आपल्या आईच्या समोर बसल्याचं दिसत आहे. ती आईवर आरडाओरडा करताना दिसते. यानंतर ती आईला मारहाण करते आणि त्यानंतर पायाला जोरात चावा घेते. यादरम्यान निर्मला देवी हात जोडते, ओक्साबोक्शी रडते. मात्र तरीही लेकीला तिची दया येत नाही. आरोपी रिता पीडितेचे केस जोरात ओढते. रिता पीडितेच्या थोबाडीत मारते आणि तू कायम जिवंत राहणार आहेस का? असा प्रश्न विचारते. 

पीडितेचा भाऊ अमरदीप सिंह याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने केलेल्या आरोपानुसार, रिताने आपली वडिलोपार्जित जमीन ६५ लाखांमध्ये विकली आणि सर्व पैसे स्वत:जवळ ठेवले. यानंतर तिने आपल्या आईला घरात बंद करून ठेवले. दरम्यान रिताने भावाला घरात येण्यास बंदी घातली होती. दरम्यान या प्रकरणात रिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: