- केतन अग्रवाल की हत्या के आरोपी मंगेतर सिया और उसके ब्वॉयफ्रेंड चेतन का नया वीडियो सामने आया है
- वीडियो में दोनों साथ बैठकर लोकल Market Yard Cricket League का मैच देख रहे हैं
- सिया के माता-पिता और भाई साहिल से लोनावला पुलिस ने पूछताछ की और उनके बयान रिकॉर्ड किए
Ketan Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी सीया गोयल आणि चेतन चौधरीला गुरुवारी गुप्तपणे लोहगड किल्ल्याजवळ घेऊन गेली होती. पोलीस सूत्रांनुसार, दोन्ही आरोपींना सकाळी साधारण ११ वाजता किल्ल्याजवळ आणण्यात आलं होतं. यादरम्यान तपास अधिकाऱ्यांनी दोघांची चौकशी केली. त्यांनी गडावर जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर केला याबाबतही विचारपूस करण्यात आली.
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन वेगवेगळे रस्ते आहेत. सीया आणि चेतनला याबाबत विचारण्यात आलं. यानंतर दोन्ही आरोपींना पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. दरम्यान सीया आणि चेतन एकमेकांवर आरोप करीत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे.
सीया फक्त दहावी पास...
यादरम्यान सीया गोयलबाबत नवनवे दावे समोर येत आहेत. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आरोप केला आहे की, लग्न ठरेपर्यंत गोयल कुटुंबीयांनी सीयाचं शिक्षण आणि तिच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत चुकीची माहिती दिली होती. विशाल अग्रवाल यांनी सांगितलं की, जेव्हा दोन्ही कुटुंबात लग्नाची बोलणी सुरू होती, तेव्हा सीयाचं बीकॉमपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्याचं सांगितलं आणि लवकरच ती बेकरीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असल्याचं म्हटलं. केतन यांच्या वडिलांनुसार, पोलीस तपासादरम्यान समोप आलेल्या गोष्टीने त्यांना मोठा झटका बसला आहे. त्यांनी दावा केला आहे की, सीया केवळ १० वी पार आहे आणि १२ वीची परीक्षा नापास झाली होती. विशाल अग्रवाल यांच्यानुसार, ही माहिती त्यांना लग्नावेळी देण्यात आली नव्हती.
सीयाला वाईट सवयी?
केतनच्या वडिलांनी आरोप केला आहे की, सीयाला दारूसह अनेक वाईट सवयी होत्या आणि तिचं कुटुंबही तिच्या वाईट सवयींमुळे चिंतेत होतं. त्यांचा दावा आहे की, म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांनी एका चांगल्या आणि संपन्न कुटुंबात तिचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून तिचं आयुष्य पुन्हा मार्गी लागू शकेल.
विशाल अग्रवाल यांच्यानुसार, यामुळे सीयाच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर केतनसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. या दाव्यातील अधिकृत पुष्टी झालेली नाही आणि पोलिसांनीही या संबंधात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. न्यूज१८ हिदींने यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे.