Khopoli News : हळद रंगली रक्ताने! नाचण्यावरून वाद, गेला एका भावाचा जीव

हळदीचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वजण आनंदात नाचत होते. मात्र पुढच्याच क्षणी सर्व वातावरण शोकाकूल झालं.

जाहिरात
Read Time: 2 mins

खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावाच्या इस्टूल वाडीमध्ये काल रात्री हळदीच्या समारंभातील आनंदाचं वातावरण दु:खात बदललं. हळदीचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जात होता. सर्वजण आनंदात नाचत होते. यादरम्यान डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंदपणे नाचणाऱ्यांना अडवणं दोन भावांना महागात पडलं आहे. या भांडणात एका भावाची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे च्या रात्री बीड गावाच्या आदिवासी वाडीत लग्नसमारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मंद्यधुंद होऊन नाचत होते.  शर्ट काढून ते नाचत होते. आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवलं. इथं  मुली-महिला नाचत आहेत. त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका असं सांगितले. तेव्हा त्या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकणे व प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली.

तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंता वाघमारे हा भांडण मिटवायला मधे पडला. तेव्हा प्रकाश पवार याने बाजूला पडलेला भात शिजवायचा भला मोठा कालता ( उलाथने ) उचलला व विलास वाघमारे याच्या डोक्यात व हातावार मारला. त्यानंतर विलास वाघमारे रक्तबंबाळ होऊन बाजूला पडले. यानंतर भांडण मिटवायला आलेला विलासचा मोठा भाऊ अनंताच्या छातीवर कालत्याने जोरदार वार केले.

Advertisement

नक्की वाचा - Pune Crime : Night Shift ला जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात अडवलं, कंपनीजवळच महिलेच्या शरीराचे तोडले लचके

दरम्यान दोन्ही भावांना रिक्षाने खोपोलीतील रुग्णालयात आणण्यात आले. पण हाणामारीत मोठा भाऊ अनंता वाघमारे यांचा रुग्णालयात पोहचयच्या आत त्याची प्राणज्योत मालावली. तर विलास वाघमारे याच्या डोक्यात सहा टाके पडले आहेत.

सदर घटना खोपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी तेथून पसार झाले. मात्र त्या दोघांपैकी बाबू मधुकर मुकणे यास केळवली रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडलं. पण दुसरा आरोपी प्रकाश रमेश पवार अद्याप सापडलेला नाही. खोपोली पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article