Kolhapur News: शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्यांचा फोटो अन् अघोरी पूजा, कोल्हापूरमधील घटनेने खळबळ

Kolhapur Black Magic: तीनही संस्था सदस्यांच्या फोटोवर गुलाल, हळद-कुंकू टाकून टाचण्या मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर: पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि प्राचार्यांचे फोटो लावून अघोरी प्रकार केल्याचं उघडकीस आले आहे. करवीर तालुक्यातील स्मशानभुमीत हा प्रकार घडला. या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

नक्की वाचा: ट्रॅक्टर शोरुममध्ये काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग, 'पगार वाढवून देतो' म्हणत दुष्कृत्य केलं

समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, संचालक आणि प्रचार्यांच्या फोटो लावून अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. करवीर तालुक्यातील एका स्मशानभूमीत हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. तीनही संस्था सदस्यांच्या फोटोवर गुलाल, हळद-कुंकू टाकून टाचण्या मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Advertisement

करवीर तालुक्याील वडकशिवाले येथून बाचणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या स्मशानभूमीत ही पूजा झाली.  संस्थेतील लिपिकांना पदोन्नती दिल्याच्या नाराजीतून असा काही प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Monsoon session: ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका? हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर महायुती सरकारकडून रद्द

दरम्यान, कोल्हापूरमध्ये या आधीही अघोरी प्रकार केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच शिरोळ तालुक्यातील एका गावामध्ये महिला आणि पुरुषाने नग्न होत अघोरी पूजा केल्याचं समोर आले होते. वृद्धाच्या मृत्यूनंतर उदगाव येथील स्मशानभूमीत हा प्रकार घडला होता, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्याचबरोबर पंचगंगेच्या घाटावरही एका महिलेचे भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाने अघोरी पूजा केल्याचं समोर आले होते. 

Topics mentioned in this article