विशाल पुजारी
इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. पण या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. विरोध इतका की त्यांनी टोकाचे पाऊल उचलताना मागे पुढेही पाहीले नाही. मुलीच्या वडीलांनी जावया विरोधात भयंकर कट रचला. त्यात त्याने आपल्या कुटुंबातील लोकांनाही सहभागी करून घेतलं. अशा पद्धतीने लग्न करण हे त्यांना पचवता येत नव्हतं. त्यामुळेच जावयाला अद्दल घडवायची असा निश्चिय त्यांनी केला होता. त्यातूनच एका भयंकर कटाला त्यांनी दिशा दिली. शिवाय तो कट यशस्वी करूनही दाखवला. पण त्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्याने सर्वच जण हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विशाल मोहन आडसुळ कोल्हापुरातील भुयेवाडी इथं राहाणार तरुण आहे. त्याची ओळख श्रीकृष्ण कोकरे यांच्या मुली बरोबर इन्स्टाग्रामवर झाली. पुणे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत त्यांनी घरी ही सांगितले होते. पण जात आडवी आली. दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला. पण त्या दोघांनी घरच्यांचा विरोधा झुगारत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सात महिन्यांपूर्वी त्यांनी पळून जाऊन लग्न केले. पोरीनं पळून जावून आंतरजातीय विवाह करणे श्रीकृष्ण कोकरे यांना पटलं नाही. त्यांनी याचा बदला घेण्याचे ठरवले होते. त्यातून त्यांनी एक कट रचला.
याच रागातून जावया विशाल अडसुळचे अपहरण करण्याचं कोकरे यांनी ठरवलं. त्यानुसार त्यांनी विशाल आडसुळ याचे भुये येथून अपहरण केले. त्यानंतर त्याला वेधस अपार्टमेंट मिरज कोर्टच्या मागे कोंडून ठेवले. तिथे त्याला जबर मारहाण करण्यात आली. विशाल गायब असल्याने त्याची तक्रार पोलीसात करण्यात आली. पोलीसांनी तांत्रिक तपासाद्वारे मिरज गाठले. वेधस अपार्टमेंट इथल्या फ्लॅटला कुलूप लावण्यात आलं होतं. ते कुलूप तोडण्यात आलं. आतमध्ये विशालला दोरीने बांधलेले होते. शिवाय त्याला जबर मारहाण झाली होती. तो जखमी होता. पोलीसांनी त्याची सुटका करून त्यास उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.
ट्रेंडिंग बातमी - Sanjay Raut : महाविकास आघाडीत भूकंप, संजय राऊतांची शरद पवारांबद्दल जाहीर नाराजी
याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देण्यात आलेल्या तक्रारीनुसार मुलीचे वडील श्रीकृष्ण महादेव कोकरे, धीरज उर्फ हणमंत नामदेव पाटील, राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी यांच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या प्रकरणात कोकरे यांना मदत करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल असून चौघाचा तपास सुरु आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तीन तपास पथके यासाठी बनवली होती.
विशाल आडसुळ याचे अपहरण झालेल्या ठिकाणापासून कोल्हापूर, सांगली जिल्हा परिसरात स्थानिक लोकांना सोबत घेवून तपास सुरु केला. एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, अपहरीत व्यक्ती विशाल आडसुळ याचे अपहरण श्रीकृष्ण कोकरे आणि त्याचे साथीदाराने केले असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार काही पथके सांगली येथे रवाना केली होती. त्यानंतर अंकली पुल येथून श्रीकृष्ण कोकरे याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अपहरीत व्यक्तीबाबत तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याला विश्वासात घेवून तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. या गुन्हा त्याने 6 साथीदारासह केल्याचेही त्याने सांगितले.