Kolhapur News: 'गर्भपात कर नाही तर घटस्फोट दे', प्रेमाविवाहनंतर गर्भवती पत्नीसोबत करायचा विकृत कृत्य

पीडिता नर्सिंगचे शिक्षण घेत असताना रोहितशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर गेल्यावर्षी मे महिन्यात रोहित आणि पीडिताचा विवाह झाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

प्रेमविवाह नंतर घडत असणाऱ्या अन्यायकारक  घटना सातत्याने समोर येत आहेत. सध्याचे बदललेले ट्रेंड यामध्ये चर्चेत आहेत. कुठे लग्नाचा ट्रेंड, तर काही ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड, हा घात करताना दिसतोय. कोल्हापुरात एक प्रकरण जुनं होत नाही, तोपर्यंत आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण आहे प्रेमविवाहनंतर दहा लाखांच्या हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा छळ करणारं. त्या तिच्या बरोबर होणाऱ्या अन्य घटनांमुळे कोल्हापूर हादरून गेलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यभरात सध्या महिला अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रेमविवाह झाल्यानंतर  अनेक विकृत घटना निदर्शनास येत आहेत. पुणे येथील हगवणे प्रकरण ताज असतानाच आणखी एका प्रेमविवाहमध्ये महिलेचा छळ होत असल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातल्या या घटनेमध्ये प्रेमविवाह  झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच एका गर्भवती महिलेचा छळ सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 10 लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक छळ करून जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. करवीर तालुक्यातील  वरणगे पाडळीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेनं पतीविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहीत अर्जुन दुधाणे असं पतीचं नाव आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Kalyan News: परदेशात जाण्याआधीच विमान जमिनीवर उतरले, कोट्यावधींचा गंडा घालत शेकडो तरुणांना फसवले

गर्भपात कर नाहीतर घटस्फोट दे
पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पती रोहित दुधाने हा रोज कामावरुन आल्यानंतर मला बाळ नको असं सांगायचा. गर्भपात कर, पोट खाली कर..मला घटस्फोट दे, तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, मला आता 10 लाख रुपये दे नाही, तर मला सोडून जा असे म्हणून त्रास देत होता.  रोहित घरातून लवकर जाण्यावरून पीडिताने विचारणा केली असता शिवीगाळ करत तू पहिल्यांदा गर्भपात कर, मग बोल, तू माझ्याकडे राहू नको, निघून जा अशी धमकी दिली. संध्याकाळी उशिरा आल्यानंतर विचारणा केली असता तू मला काही विचारायचं नाही. पोटावर फटका मारून ठार मारीन अशी रोहितने धमकी दिली, असं तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shocking news: DJ च्या आवाजाने मुलीला आला हार्ट अटॅक, ती तडफत राहिली, रुग्णालय पाहात राहिलं, शेवटी...

प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशाची मागणी
पीडिता नर्सिंगचे शिक्षण घेत असताना रोहितशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर गेल्यावर्षी मे महिन्यात रोहित आणि पीडिताचा विवाह  कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत झाला. विवाहानंतर चार महिन्यांनी पीडिता ऑक्टोबर 2024 मध्ये गर्भवती राहीली. त्यानंतर रोहितने किरकोळ कारणांवरून पीडिताला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडिताने आपल्या तक्रारीत ऑक्टबर 2024 ते 2 जून 2025 पर्यंत पती रोहितने तुझ्या आई वडिलांनी मला लग्नात काहीच दिले नाही, त्यामुळे दहा लाख रुपये दे म्हणत मारहाण करुन माझा शाररीक, मानसिक छळ  करत जीवे मारणेची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Political News : "उद्धव साहेब एक फोन करा, आम्ही तयार आहोत", युतीच्या चर्चेवर मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पीडितेला संशय 
रोहित पीडित महिलेला रोज त्रास देत होता. लग्नाच्या वर्षभरातच त्याने पत्नीला त्रास देण्यासाठी सुरुवात केली. त्यानंतर पत्नीला त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले. पीडित्याच्या नातेवाईकांसमोर त्याचा हा कारनामा उघडकीस  आला. रंगे हाथ पकडलेल्या रोहितने 1 जून रोजी पिडीत महिलेच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला केला. पीडिताच्या नातेवाईक यांनी या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला  आहे. पोलिसांनी रोहितचा शोध घेवून त्याला अटक देखील केली आहे.