जाहिरात

Shocking news: DJ च्या आवाजाने मुलीला आला हार्ट अटॅक, ती तडफत राहिली, रुग्णालय पाहात राहिलं, शेवटी...

लोक आंदोलनावर करत असल्याची माहिती मिळताच शिवहर पोलीस ठाण्याचे पोलिस रुग्णालयात पोहोचले.

Shocking news: DJ च्या आवाजाने मुलीला आला हार्ट अटॅक, ती तडफत राहिली, रुग्णालय पाहात राहिलं, शेवटी...

शेजारच्या घरात लग्न होतं. त्यांची वरात निघाली होती. त्यावेळी मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आला होता. डीजेचा आवाज इतका मोठा होता की  एका 15 वर्षांच्या मुलीला थेट हार्ट अटॅक आला. पिंकी कुमारी असे या मुलीचे नाव आही. ती मुळची बिहारीची रहीवाशी आहे. तीला हृदयविकाराचा त्रस्त होता. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ती अचानक बेशुद्ध होऊन खाली पडली. त्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पिंकीच्या शेजारच्या सोनफी साह यांच्या नातवाच्या लग्नाची वरात होती. या निमित्ताने डीजे लावण्यात आला होता. पिंकी आपल्या कुटुंबासह घराबाहेर मिरवणूक पाहण्यासाठी गेली होती. त्याचवेळी डीजेच्या प्रचंड मोठ्या आवाजामुळे ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. नातेवाईकांनी तिला तातडीने दुचाकीवरून जवळच्या रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणा  पिंकीचा जीव गेला. पिंकीचे काका मोतीलाल साह यांनी सांगितले की, रुग्णालयात पोहोचल्यानंतर सुमारे एक तासानंतर तिच्यावर उपचार सुरू झाले. या काळात पिंकी वेदनेने तडफडत होती. परंतु कोणीही तिची दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Political News : "उद्धव साहेब एक फोन करा, आम्ही तयार आहोत", युतीच्या चर्चेवर मनसे नेत्याचं मोठं वक्तव्य

पिंकी कुमारी ही शहरानजीकच्या प्रशिदपूर गावातील वार्ड नंबर 5 मध्ये राहत होती. ती हृदयविकाराने त्रस्त होती. दिल्लीतील पंत रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या वडिल हे रिक्षाचालक आहेत. रिक्षा चालवून तिच्या उपचाराचा खर्च उचलला होता. आठवड्याला सुमारे 1500 रुपयांची औषधे ते रिक्षा चालवूनच तिला देत होते. पिंकीवर पाच वर्षे उपचार चालले होते.  उपचारानंतर ती पूर्णपणे बरी झाली होती. मोतीलाल साह यांनी पिंकीला 'रील्स' बनवण्याचा छंद होता असेही सांगितले.

ट्रेंडिंग बातमी - Samriddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, 9 इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहिती आहे का?

पिंकीच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू केले. त्यांच्या घोषणाबाजीमध्ये स्थानिक लोकही मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत आले. आरोपी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ते करत होते. घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे अध्यक्ष राजन नंदन सिंह यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ही डॉक्टर आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणाची स्पष्ट घटना असल्याचे म्हटले.  संबंधित अधिकारी व डॉक्टरांवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज देणार असल्याचे ही त्यांनी वेळी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Politics: 'भाजपच्या 27 आमदारांचे फोन आले..', ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा दावा; खास कारण सांगितलं!

लोक आंदोलनावर करत असल्याची माहिती मिळताच शिवहर पोलीस ठाण्याचे पोलिस रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी लोकांना समजावून शांत केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com