Kolhapur News: कर्जबाजारी ड्रायव्हरचे भयंकर पाऊल, मालकाच्याच घरात घुसला अन् जे केलं ते पाहून...

स्थानिक गुन्हे शाखा आणि राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

कर्जबाजारी झालेल्या तरुणांची संख्या सध्या वाढत आहे. अशात डोक्यावर असलेलं कर्ज फेडण्यासाठी अनेकजण ना-ना प्रकार करत असतात. कोल्हापुरात एक अशी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये कर्जबाजारी असलेल्या तरुणाने मालकाच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चाकूचा धाक दाखवून दोघांनी मिळून तब्बल 50 लाखांची जबरी चोरी केली आहे.या प्रकरणी दोन्ही चोरट्याना पोलिसांनी अटक केली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

घरच्या ड्राईव्हरनेच आपल्या मालकाच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. सम्राटनगर येथील एका उद्योजकाच्या घरात ही चोरी झाली. 440 ग्रॅम सोन्याचे दागिने, 75 हजार रोख रक्कम अशी एकूण 50 लाख 25 हजार रुपयांची चोरी झाल्याची माहीती पोलिसांनी मिळाली. या प्रकरणाची राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. राजीव जयकुमार पाटील हे  60 वर्षाचे असून ते गोविंद सावंत हौसींग सोसायटी सम्राटनगर इथं राहतात. त्यांनी ही तक्रार दिली आहे. ही घटना घडल्यानंतर 12 तासांच्या आत चोरांचा छडा पोलिसांनी लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे. प्रकाश चौगुले आणि त्याच्या साथीदाराने मिळून हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Beed News: 13 वर्षांची मुलगी, 30 वर्षांचा नवरा, एकाच मांडवात दोघांशी लग्न, पुढे जे घडलं ते...

राजीव जयकुमार पाटील हे कोल्हापुरातील उद्योजक आहेत. सम्राटनगरमधील गोविंद सावंत हौसींग सोसायटी मध्ये ते राहतात. उद्योजक असल्याने रोज कामानिमित्त नेहमी प्रमाणे त्यांच्या घरातील सर्व लोक दिवसभर घर बंद करून व्यवसायाच्या ठिकाणी जातात. गुरुवारी (12 जून) घरामध्ये राजीव पाटील यांचे वयस्कर सासरे असल्याने त्यांना घरी ठेवून बाहेरील बाजूस कुलूप लावून गेले होते. दुपारी तीन ते साडे तीनच्या सुमारास दोन हेल्मेटधारी अज्ञात चोरटे त्यांच्या घरात शिरले. घराच्या बाहेरील बाजूस ठेवलेल्या चावीने घराचा मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादीच्या सास-यांना चाकुचा धाक दाखवुन पाटील यांच्या घरातील सोन्याचे दागीने असलेले गोदरेज कंपनीचे कॉम्पेक्ट साईजचे दोन लॉकर चोरून नेले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: अंगावर काटा आणणारी घटना! वडीलांना शॉक लागला म्हणून लेक वाचवायला गेली, पण तिही...

पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कोल्हापूर शहरामध्ये अशा प्रकारे दिवसा जबरी चोरीचा तपास पोलिसांनी सुरु केला.  पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार केले. या पथकाने हा तपास सुरु केला. पथकाने गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याचे ठिकाणची पाहणी व आसपासचे परिसराची पाहणी केली. तपासानुसार एका सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांनी मोपेड गाडीचा देखील वापर केला होता. घरातून चोरलेले सर्व साहित्य घेऊन हे चोरटे लक्ष्मी टेकडीला येणार अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Plane crash News: नेपाळची मुलगी, बिहारमध्ये शिकली, विमान कंपनीत कमाला लागली, पण पुढे भयंकर शेवट

त्यानुसार या ठिकाणी प्रकाश दत्तात्रय चौगुले आणि अमित विश्वनाथ शिंदे अशा दोघांना पोलिसांनी एक दुचाकी आणि चारचाकीसह ताब्यात घेतलं. या दोघांकडून तीन लहान लॉकर, दोन बॅगा, चाकु, दोन हेल्मेट, रेनकोट असे साहित्य जप्त केले आहे. दोघांपैकी एक प्रकाश चौगले हा पाटील यांच्या घरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. हा बेळगाववरून यायचा. गेल्या काही दिवसांपासून तो कर्जामूळे हैराण झाला होता. याच कर्जबाजारी अवस्थेमूळे त्याने चोरी करण्याचं ठरवलं. साथीदार अमित शिंदे याला सोबत घेऊन पहिली चोरी मालकाच्या घरीच करण्याचं ठरवलं. चोरी करून पळून जाताना ते अपयशी ठरले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले.