Kolhapur News: व्याजाच्या बदल्यात शरीरसुख! महिला वाईट फसली, कधी लॉज कधी, कधी गाडीतच संबंध, Video ही काढले

पोलिसांनी नराधम अमित सावंतवर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • कोल्हापूर परिसरात कर्जाच्या व्याजाच्या वादातून एका महिलेचा आरोपी अमित सावंतने शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे
  • आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करत २ लाख रुपयांच्या कर्जावर अतिरिक्त व्याज घेतले होते
  • पीडित महिला सामाजिक संस्थेत आरोग्य सल्लागार म्हणून कार्यरत असून आर्थिक अडचणींमुळे कर्ज घेतले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कोल्हापूर:

विशाल पुजारी

कर्जाच्या पैशांची परतफेड वेळेत न झाल्याचा गैरफायदा घेत एका नराधमाने महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर परिसरात उघडकीस आली आहे. त्याने या महिलेवर केवळ अत्याचारच नाही, तर अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग ही केले.  संशयिताने पीडितेच्या कुटुंबालाही लक्ष्य केले होते. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी मुडशिंगी येथील अमित कृष्णात सावंत याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सावकारी पाशात अडकलेल्या एका महिलेची नराधमाने अब्रू लुटल्याची  ही घटना समोर आल्यानंतर कोल्हापुरात संताप व्यक्त केला जात आहे. 10 टक्के व्याजाने घेतलेल्या 2 लाख रुपयांच्या बदल्यात अमित सावंत याने पीडितेवर हॉटेल आणि चालत्या कारमध्ये वारंवार शरीरसंबंध ठेवले. तो एवढ्यावरच न थांबता त्याने अश्लील व्हिडिओ काढले होते. त्यातून तो पीडितेला वारंवार ब्लॅकमेल ही करत होता. 

पीडित महिला एका सामाजिक संस्थेत आरोग्य सल्लागार म्हणून कार्यरत आहे. 2023 मध्ये आर्थिक अडचणींमुळे त्यांनी अमित सावंतकडून 10 टक्के व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते. काही महिने नियमित व्याज दिल्यानंतर आर्थिक ओढाताण सुरू झाली. त्यामुळे तिने घेतलेल्या कर्जावरचे व्याज ती देवू शकत नव्हती. याचाच गैरफायदा घेत चालक म्हणून काम करणाऱ्या सावंतने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. एकदा महिला घरी एकटी असताना त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. शिवाय त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये शरीरसंबंधांचे अश्लील चित्रीकरण केले. त्यानंतर त्या व्हिडीओच्या माध्यमातून व्याज म्हणून तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत राहीले. गेले तिन वर्षे हे सर्व सुरू होते. 

Advertisement

नक्की वाचा - Alcohol Effects: उन्हाळ्यात दारू पिताना काय काळजी घ्याल? 'या' चुका टाळा नाही तर होईल मोठा घात

पीडितेने नोव्हेंबर 2025 पर्यंत व्याजासह 2 लाख 10 हजार रुपये परत केले होते. तरीही केवळ 25 हजार रुपयांसाठी आरोपीने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा आरोपीने हे व्हिडिओ कार मालकाला पाठवून बदनामी केली. यावर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या जावयालाही बेदम मारहाण केली. प्रकरण डोक्यावरून जात असल्याचं पीडितेच्या लक्षात आले. बदनामीच्या नावाने ती आतापर्यंत शांत होती. पण आता तिने झालेल्या अन्याया विरुद्ध तक्रार देण्याचा निश्चय केला. त्यानुसार तिने पोलीसात धाव घेतली. शिवाय झालेला प्रकार तिने पोलीसांना सांगितला.पोलिसांनी तातडीने याबाबत तक्रार दाखल केली. शिवाय तपास सुरू केला. 

नक्की वाचा - Viral Video: 10 रुपयांची पाण्याची बाटली लंडनमध्ये किती रुपयांना ? किमत ऐकून हैराण व्हाल, तर गाजराची किमत..

चौकशीत काही गोष्टी समोर आल्या. पीडिता आरोग्य क्षेत्रात काम करते. घर गहाण ठेवल्याने ते सोडवण्यासाठी त्यांनी आरोपीकडून पैसे घेतले होते. गाडीवर चालक म्हणून येणाऱ्या अमितने महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत तिचे नग्न व्हिडिओ बनवले. 'व्हिडिओ व्हायरल करेन' अशी धमकी देऊन त्याने वेळोवेळी अत्याचार केले. पीडितेने मुद्दल आणि व्याज फेडूनही आरोपीची पैशांची हाव संपली नव्हती. आरोपीने पीडितेच्या जावयाला हॉटेलवर बोलावून तिथे सासूचे अश्लील व्हिडिओ दाखवले. "तुझ्या सासूला पैसे द्यायला सांग" असे म्हणत त्याने जावयाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने गांधीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी नराधम अमित सावंतवर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.