Kolhapur News: बाहुली,गुलाल अन् लोखंडी खिळे! सोडचिट्टीसाठी स्मशानभूमीत काळी जादू

कुर येथील स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार, गावातील स्मशानभूमीत ग्रामस्थांना आढळून आलेल्या वस्तुमध्ये एक चिठ्ठी फार महत्वाची आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

अंधश्रद्धा पसरल्याच्या अनेक घटना कोल्हापूर जिल्ह्यात सध्या  दिसून येत आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीत चिठ्ठी लिहून, गुलाल -कुंकू, लिंबू ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या भुदरगड तालुक्यातील एका गावात ही घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे एका महिलेनच अशा प्रकारची अघोरी पूजा केली आहे. ही पूजा पतीसोबत सोडचिठ्ठी आणि इतर काही व्यक्तींचं आयुष्य बरबाद व्हावं यासाठी केल्याचे निदर्शनास आलं आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अलीकडच्या काळात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचं ही निदर्शनास आलं आहे.  

भुदरगड तालुक्याच्या कुर गावातील स्मशानभूमीत ही घटना घडली आहे. या गावातील एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी गावकरी स्मशानभूमीत जमले. यावेळी गावाकऱ्यामधील काही व्यक्तींना कोणतीतरी पूजा केल्याचे दिसून आलं. या पूजेमधील साहित्यवरून हा एखादा करणी भानामतीचा प्रकार असल्याचा काहींनी अंदाज बांधला. त्यामुळे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आलेल्या ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण तयार झालं. या स्मशानभूमितील ग्रामस्थानी जे पाहिलं त्यामध्ये एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीवरून हा सगळा प्रकार एका विवाहित महिलेनं केला असावा असा अंदाज बांधला जात आहे. सोडचिट्टी मिळावी आणि काही लोकांचं वाईट होउ दे या हेतूने ही पूजा केल्याचे चिठ्ठीतील मजकूरवरून दिसून आलं. हा सगळा प्रकार घडलेल्या कुर गावात आता अंधश्रद्धा विषयक अनेक उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. 

नक्की वाचा - Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण

कुर येथील स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार, गावातील स्मशानभूमीत ग्रामस्थांना आढळून आलेल्या वस्तुमध्ये एक चिठ्ठी फार महत्वाची आहे. एक बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि लिहिलेला कागद अशा या सगळ्या वस्तू होत्या. जो कागद आढळून आला ती एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीतील मजकूर वाचल्यानंतर ही अंधश्रद्धा नेमकी कशासाठी असेल याचा अंदाज येतो. चिठ्ठीत लिहलेल्या मजकूरात एका महिलेचं नाव लिहलेलं होतं. या नावानंतर सोडचिट्टी मिळावी आणि काही लोकांची नावे लिहिलेली. ज्या लोकांची नावे लिहिलेली त्यांची वाट लागू दे असं लिहिलेलं होतं. 

नक्की वाचा - Gaurav gogoi: 'पहलगाममध्ये दहशतवादी कसे घुसले, सरकार हे का सांगत नाही? गौरव गोगोईंचा पलटवार

स्मशानभूमीत जी चिठ्ठी होती त्या चिठ्ठीनुसार हा एका महिलेन पतीकडून सोडचिठ्ठी मिळावी यासाठी हा प्रकार केला असावा असा अंदाज बांधला जात आहे. पतीसोबत जी महिला असते तीच आणि काही लोकांचं वाटोळं व्हावं असा निष्कर्ष बांधला जात आहे. एखाद्या घराची सुख शांती बिघडू दे यासाठी केलेली ही एक पूजा असावी असं सगळ्या वस्तुस्थितीनुसार समजत आहे. त्यामुळे गावात या अंधश्रद्धेच्या घटनेविरोधात काहींनी संताप व्यक्त केला आहे. पुरोगामी ओळख असलेल्या कोल्हापुरात या घटना वाढत आहेत. अशा घटनामुळे जिल्ह्यात चर्चा आहेत.

Advertisement